Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीचा निकाल आज शनिवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. हा निकाल मोबाईलवर कसा पाहाल? याबाबत जाणून घेऊयात…

Maharashtra HSC Exam Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या (HSC Exam Result 2026) निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या परीक्षेचा निकाल आज शनिवार, 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. आज सकाळी 11 वाजता राज्य मंडळाच्या मुख्य कार्यालयात होणाऱ्या पत्रकार परिषदेत राज्यातील नऊ विभागीय मंडळांचा (पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण) एकत्रित निकाल आणि सांख्यिकीय माहिती जाहीर केली जाणार आहे.
अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जा
Maharashtra HSC Exam Result 2026: SMS वर निकाल पाहण्यासाठी काय करावे?
निकाल जाहीर झाल्यावर एकाच वेळी लाखो विद्यार्थी वेबसाईटवर येतात, ज्यामुळे सर्व्हर स्लो होण्याची किंवा वेबसाईट क्रॅश होण्याची शक्यता असते. अशा वेळी विद्यार्थी SMS द्वारे आपला निकाल त्वरित मिळवू शकतात.
Maharashtra HSC Exam Result 2026: काय मेसेज टाईप कराल?
12वीचा निकाल एसएमएसद्वारे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना “MHHSC” असं टाकून 57766 वर SMS सेंड करायचा आहे. त्यानंतर निकाल त्यांच्या फोनवर SMS च्या माध्यमातून दिसणार आहे.

Maharashtra HSC Exam Result 2026: या वेबसाईटवर दिसणार निकाल
दुपारी 1 वाजता खालील अधिकृत वेबसाईटवर निकाल उपलब्ध होईल.
https://hscresult.mkcl.org/
https://hscresult.mahahsscboard.in/
https://mahresult.nic.in/
अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जा
Maharashtra HSC Exam Result 2026: निकालासाठी काय लागेल?
1. विद्यार्थ्याचा सीट नंबर (Seat Number)
2. आईचे नाव (Mother’s First Name)
Maharashtra HSC Exam Result 2026: वेबसाईटवर निकाल कसा पाहायचा?
- mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahahsscboard.in यातील कोणत्याही एका अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- ‘HSC Examination Result 2025’ लिंकवर क्लिक करा.
- तुमचा रोल नंबर (Roll Number/Seat Number) टाका.
- तुमच्या आईचे पहिले नाव टाका.
- ‘View Result’ वर क्लिक करा.
- निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंटआऊट किंवा स्क्रीनशॉट घ्या.
DigiLocker: डिजीलॉकरचा पर्याय
वेबसाईट आणि एसएमएस व्यतिरिक्त विद्यार्थी ‘डिजीलॉकर’ वरूनही आपली डिजिटल मार्कशीट डाउनलोड करू शकतात. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी हा एक सुरक्षित आणि जलद पर्याय मानला जातो.
HSC Exam 2026: बारावीची परीक्षा कधी पार पडली?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर बोर्डाने विक्रमी वेळेत उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करत निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली आहे. बारावीचा निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या निकालाचा विचार केला असता, एकूण उत्तीर्ण टक्केवारी 91.88 टक्के होती. दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षीही मुलींनीच आघाडी घेतली होती. मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 94.54 टक्के इतकी होती, तर मुलांची उत्तीर्ण टक्केवारी 89.51 टक्के होती.
दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर जे विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरतील, त्यांच्यासाठी बोर्डाकडून तत्काळ पुरवणी परीक्षेची प्रक्रिया सुरू केली जाईल. पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न जाता ते त्याच वर्षात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकतील.
आणखी वाचा















