सांगोला (प्रतिनिधी):- एच एस सी फेब्रुवारी मार्च 2026 परीक्षेचा निकाल आज दुपारी बारा वाजता पुणे बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला. या परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज सांगोला ने घवघवीत यश संपादन करत यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
शास्त्र शाखेमधून एकूण 516 विद्यार्थी परीक्षेस बसलेल होते, यापैकी 476 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शास्त्र शाखेचा एकूण निकाल 92.25 टक्के लागला आहे. शास्त्र शाखेमधून सागर गणपत फुले याने 90.83% गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळवला तर कोमल नवनाथ केदार हिने 87.17% गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक मिळवला. संचित संजय शिंदे याने 86.50% गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक मिळविला.
कला शाखेचा निकाल 70.87% लागला असून कला शाखेमधून एकूण 206 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 146 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कला शाखेचा एकूण निकाल 70.87 % लागला आहे. यामध्ये प्रज्ञा महादेव चंदनशिवे हिने 79% गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळविला. शोभना दत्तात्रय खरात हिने 76.50% गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक मिळविला. रोहिणी राजेंद्र होवाळ हिने 74.50% गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक मिळविला.

व्यवसाय अभ्यासक्रम (2 कि.कौ.विभाग) विभागामधून 43 विद्यार्थी परीक्षेत बसले होते, त्यापैकी 38 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल 88.37% लागला आहे. यामध्ये राहुल तम्मा येलपले याने 70.67% गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळवला. यश विजय बनसोडे याने 68.17% गुणप्राप्त करत द्वितीय क्रमांक मिळविला. वंचिता महादेव कोळेकर हिने 67% गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक मिळविला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ अनिकेत देशमुख, संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर, सर्व संस्था सदस्य, प्राचार्य प्रा.केशव माने, उपप्राचार्य प्रा संतोष जाधव, उपमुख्याध्यापिका सौ.वैशाली घोडके मॅडम, पर्यवेक्षक श्री.दशरथ जाधव सर, श्री.तात्यासो इमडे सर, श्री माणिकराव देशमुख सर यांच्यासह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.















