टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे एच.एस.सी.बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश

Sangola

गणित विषयात १०० पैकी १००  गुण मिळवत स्वरदा  वांगीकर पुणे बोर्डात प्रथम

सांगोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे बोर्डाकडून फेब्रु/मार्च,२०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१२ वी परीक्षेचा निकाल  शनिवार दि.२ मे २०२६ रोजी आँनलाईन जाहीर झाला.सदर परीक्षेत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज मधील इ.१२ वी शास्त्र शाखेतील  विद्यार्थिनी स्वरदा  वांगीकर हिने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत बोर्डात प्रथम क्रमांक पटकाविला.तसेच कला, वाणिज्य शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले. यामध्ये ज्युनिअर कॉलेज कला शाखा  ९३.५७%, वाणिज्य शाखा  ९९.१५ % तर शास्त्र शाखेचा निकाल ९८.०१%  व ज्युनिअर कॉलेजचा एकूण निकाल ९७.५०%   आहे.

     यामध्ये कला शाखा हर्षदा बाळासाहेब गेजगे,आरती महादेव गोडसे ८३.६७% प्रथम क्रमांक, विशाखा दादासाहेब सोनवणे ८३.१७%  द्वितीय क्रमांक, अस्मिता राजेंद्र इंगोले ७९.८३ तृतीय क्रमांक,वाणिज्य शाखा  लक्ष्मी शशिकांत गोडसे ९०.३३%  प्रथम क्रमांक, आर्या किरण घोंगडे, वैष्णवी बाजीराव रणदिवे ९०.००%  द्वितीय क्रमांक, मृणाली अशोक लांडगे ८८.३३%  तृतीय क्रमांक , शास्त्र शाखा ऋचाश्री भाऊसाहेब चव्हाण   ८६.६७% प्रथम क्रमांक, स्वरदा श्रीपाद वांगीकर ८६.५०% द्वितीय क्रमांक तर धीरज संजयकुमार जगताप  ८५.०० % गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.

          वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ॲड विजयसिंह चव्हाण, सचिव म. शं. घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारिणी सदस्य शीलाकाकी झपके,विश्वेश झपके,सर्व संस्था सदस्य, प्राचार्य बिभिषण माने, उपमुख्याध्यापक चारूदत्त जगताप,उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे , पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, काकासो नरूटे, उत्तम सरगर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले..

सदर  निकाल जाहीर झाल्यानंतर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके व सचिव म.शं घोंगडे यांचे शुभहस्ते व प्राचार्य बिभिषण माने, उपमुख्याध्यापिक चारूदत्त जगताप,उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे,पर्यवेक्षक प्रदीप धुकटे,काकासो नरूटे,उत्तम सरगर व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना अभिनंदन पत्र देऊन त्यांचा पालकांसमवेत सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी विद्यार्थी हेच शिल्पकार आहेत असे सांगत स्थापनेपासून विद्यामंदिरची गुणवत्ता कायम राखत यावर्षी मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले.व पुढील शैक्षणिक वाटचालीस  शुभेच्छा दिल्या.या सत्काराबद्दल पालक व विद्यार्थ्यांनी  संस्था, शाळा व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

लायन्स क्लब ऑफ सांगोला च्या अध्यक्षपदी ला.प्रशांत रायचुरे यांची निवड; सचिवपदी ला.प्रा.प्रसाद खडतरे तर खजिनदारपदी ला. प्रा.निलेश नागणे

न्यू इंग्लिश स्कूलच्या वासंतिक वर्गास उत्साहात सुरूवात

सांगोला येथे कंटेनरला लागली आग ; कंटेनर मधील साहित्य जळून खाक

सांगोला-पंढरपूर रोडवर भीषण अपघात; मावशीला आणण्यासाठी निघालेल्या 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू, वृद्ध गंभीर जखमी

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून सांगोला तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींना इमारत निधी मंजूर

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा सांगोला येथे शनिवारी भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन