टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

लायन्स क्लब ऑफ सांगोला च्या अध्यक्षपदी ला.प्रशांत रायचुरे यांची निवड; सचिवपदी ला.प्रा.प्रसाद खडतरे तर खजिनदारपदी ला. प्रा.निलेश नागणे

On: May 2, 2026 12:49 PM
Follow Us:
सांगोला (प्रतिनिधी):-
          आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना प्रांत ३२३४ ड-१ अंतर्गत सांगोला शहर व तालुक्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी असणारी लायन्स क्लब ऑफ सांगोला या क्लबच्या वतीने विविध विषयांवर विचारविनीमय करण्यासाठी क्लबचे अध्यक्ष ला. प्रा. नवनाथ बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली व माजी प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
          सदर सभेमध्ये लायन वर्ष २०२६-२७ करिता नवनिर्वाचित पदाधिकारी निवड प्रक्रिया अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी ला. प्रशांत रायचुरे, सचिवपदी ला.प्रा.प्रसाद खडतरे तर खजिनदारपदी ला.प्रा.निलेश नागणे यांची निवड करण्यात आली.
          यावेळी ज्येष्ठ सदस्य ला.विलासनाना क्षिरसागर, विद्यमान सचिव ला.सूर्यकांत कांबळे, खजिनदार ला.मंगेश म्हमाणे, नियोजित झोन चेअरमन ला.उन्मेष आटपाडीकर, प्राचार्य ला.अमोल गायकवाड, ला.प्रा.शिवशंकर तटाळे, ला.सुनील भोरे, ला.प्रा. डी. के. पाटील, ला.प्रा.तानसिंग माळी, ला.प्रा.धनाजी चव्हाण, ला. सचिन पाटणे, ला.दत्तात्रय देशमुख यांचेसह इतर सदस्य उपस्थित होते.
आपल्या मनोगतातून उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी २०२५-२६ सालातील विविध उपक्रमांचे कौतुक करून येणाऱ्या वर्षात देखील अश्याच पद्धतीने समाजोपयोगी कामे करण्याचे आवाहन करत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.क्लबचे अध्यक्ष ला. प्रा.नवनाथ बंडगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा