सांगोला: फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये टेक्नोफॅब २ के २५ हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. टेक्निकल क्विझ, प्रोजेक्ट आयडीया, पोस्टर प्रेझेंटेशन ,ब्लाईंड सि या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील विविध पॉलिटेक्निक कॉलेज मधून ९३३ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला.
कंपनी मध्ये असणाऱ्या अद्यावत तंत्रज्ञानाचा ग्रामीण भागातील जनतेस कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो याचे सादरीकरण विद्यार्थ्यानी पोस्टर प्रझेंटेशनच्या माध्यमातून केले होते. तसेच आपल्या डोक्यातील कल्पना वास्तवात उतरविण्यासाठी प्रोजेक्ट आयडिया च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता दाखवून दिली. तंत्रशिक्षणाविषयी असलेली आपली बौद्धिक चमक दाखवण्यासाठी टेक्निकल क्विझ ही स्पर्धा उपयुक्त ठरली.
अशा प्रकारच्या स्पर्धांमधून कल्पक विद्यार्थ्याना प्रोत्साहन मिळणार असून प्रोजेक्ट आयडीया आणि पोस्टर प्रेझेंटेशन मुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यातील कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यास टेक्नोफॅब सारख्या उपक्रमातून विद्यार्थ्याना व्यासपिठ मिळत असल्याचे पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा. तानाजी बुरुंगले यांनी सांगितले. या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ अमित रुपनर , कार्यकारी संचालक मा. श्री. दिनेश रुपनर ,कॅम्पस डायरेक्टर ,डॉ. संजय आदाटे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेछया दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक प्रा. अजयकुमार भोसले, तसेच महाविद्यालयातील विविध विभागाचे को ओर्डीनेटर प्रा.गणेश शिंदे ,प्रा .श्रीकांत बुरुंगले, प्रा.संतोष चोथे , प्रा.शिवकुमार गोसावी यांनी परिश्रम घेतले.
आणखी वाचा
Election: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक; विधान परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी काय करू?; अजितदादांचा एकनाथ शिंदेंना टोला