मुख्यमंत्र्यांकडे सोपवला राजीनामा, ‘पीए’ सागर बंगल्यावर
Dhananjay Munde Resignation मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Resign) यांनी आज (4 मार्च) अखेर राजीनामा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे. बीडच्या मस्साजोगमधील (Beed Massajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh case) हत्येप्रकरणात, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर, महाराष्ट्राभरातून संतापाची लाट उसळली होती. अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते.
अडीच महिन्यानंतर राजीनामा
9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हाच विरोधकांनी ही अत्यंत क्रूर हत्या झाल्याचा आरोप केला होता. काल समाज माध्यमांवर सीआयडीच्या दोषारोपपत्रा सोबतचे फोटो समोर आले. त्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. विरोधकांनीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुद्धा अत्यंत जहाल प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यानंतर आज सकाळपासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. धनंजय मुंडे यांना कालच राजीनामा दिल्याचा दावा करण्यात येत होता. तर आज सकाळपासून विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.
पीएच्या मार्फत पाठवला राजीनामा
धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा पीएच्या, स्वीय सहायकाच्या माध्यमातून सागर बंगल्यावर पाठवल्याची माहिती समोर येत आहे. सकाळीच पीए हा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर पोहचले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनाकडे जाण्याची लगबग सुरू होती. त्यावेळी हा राजीनामा त्यांच्यापर्यंत पोहचवण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे. याविषयीची घोषणा विधानसभेत झाल्यावर त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे विरोधक म्हणतात.
महायुतीचे दोन गुंडे
दरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी विरोधकांनी आंदोलन केले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. महायुतीचे दोनच गुंडे, कोकाटे आणि मुंडे अशा घोषणा त्यांनी केल्या. तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून सत्ताधारी पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आणखी वाचा
मी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारलाय, त्यांना पदमुक्त केलंय; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
फॅबटेक इंजिनिअरींग चे प्रा. डॉ. नाना गावडे यांच्या संशोधनास जर्मन पेटंट
फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये टेक्नोफॅब कार्यक्रम उत्साहात संपन्न