maharashtrapoliticaltop news

…. तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यामध्ये जन आक्रोश मोर्चे सुरूच आहेत. आज (19 जानवेारी) छत्रपती संभाजी नगरमध्ये संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला कडक इशारा दिला. धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा घणाघाती प्रहार केला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांच्या कुटुंबाशी पाठीशी भरणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीयांच्या सुद्धा पाठीशी उभे राहणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितलं. देशमुख हत्या प्रकरणात फार मोठं नेटवर्क असून खंडणी, खून, पैसा पुरवणारे, त्यांना लपवणारे, डाके टाकणारे,बलात्कार, छेडछाड करणाऱ्या यांच्या टीम असल्याचे ते म्हणाले. ज्यांनी खून करायला पाठवले, सामूहिक कट रचणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असल्याचेही ते म्हणाले.

HTML img Tag Simply Easy Learning    

आरोपी सुटतील असं आम्हाला वाटेल त्या दिवशी राज्य बंद करू

जरांगे पाटील म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याने लोक शांत आहेत. यातील एकही जण सुटला तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी असल्याचा इशारा जरांगे पाटील यांना दिला. खंडणी आणि खून करणाऱ्यांना सांभाळलं कुणी? हे चार्जशीटमध्ये आलंच पाहिजे, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. ज्या दिवशी आरोपी सुटतील असं आम्हाला वाटेल त्या दिवशी राज्य बंद करू, असा इशारा पाटील यांनी जन आक्रोश मोर्चातून दिला. समोरचा डाव टाकतो ते ओळखायला शिका. देशमुख कुटुंबाला आलेली वेळ ही राज्यात कोणावरही येऊ नये. आज देशमुख कुटुंबावर वनवास आला आहे. हे पुढील काळात होऊ द्यायचे नसेल, तर तर धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवा असे ते म्हणाले. धनंजय मुंडेंची त्यांच्या लोकांना मूक संमती असल्याचार आरोपही त्यांनी केला एकदा मराठा बिथरला तर तुझी टोळी चटणीला देखील उरणार नाही असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना दिला.

ते म्हणाले की धनंजय मुंडे यांच्या टोळीच्या विरोधात बोलावच लागणार आहे. ते मस्तीत येणार असले तर विषय अवघड होईल असे ते म्हणाले. गुंडांच्या टोळ्या थांबवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. राजकीय नेते एकत्र असले तरी चालतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मुंबईला लॉंग मार्च जाणार आहे. त्यांच्या मोर्चामध्ये सहभागी असणाऱ्यांना मराठा समाजाने खाण्यापिण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Back to top button