सांगोला तालुक्यातील घटना ; गळा आवळून व्यवसायिकाचा खून
सांगोला- अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून कशाच्या तरी सहाय्याने गळा आवळून त्यास मारहाण करून ४५ वर्षीय सलून व्यवसायिकाचा खून करून त्याचा मृतदेह आंब्याच्या बागेत फरफटत नेऊन फेकून पसार झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कमलापूर ता. सांगोला शिवारातील हॉटेल आकाशच्या पाठीमागील आंब्याच्या बागेत घडल्याने खळबळ उडाली आहे.
संतोष चव्हाण -४५ रा. खर्डी ता. पंढरपूर असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे याबाबत. मृताची पत्नी स्वाती संतोष चव्हाण रा.खर्डी ता पंढरपूर हिने अज्ञात इसमांविरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवून संशयित गोविंद शिंदे रा.जालना यास माळशिरस येथून ताब्यात घेतले असून, संशयित फरार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी सांगितले.
फिर्यादी, स्वाती चव्हाण हिचे मृत पती संतोष चव्हाण हे खर्डी ता. पंढरपूर गावातील तुषार हिल्लाळ यांच्या सलून दुकानात कामास होता दरम्यान शुक्रवार १७ जानेवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास पती संतोष सदर दुकानात काम करीत असल्याचे मुलगा आदित्यने पाहिले होते मात्र सायंकाळी ६ च्या सुमारास तुषार हिल्लाळ यांनी घरी फोन करून संतोष घरी आलेत का ? अशी विचारणा करून सायंकाळी ५ च्या सुमारास त्यांचा जालना येथील मित्र गोविंद शिंदे हा दुकानात आला होता दरम्यान फिर्यादी गोविंद शिंदे यास ओळखत असल्याने तो अधून मधून त्यांच्या घरी येत होता तसेच फिर्यादीने शनिवारी १८ जानेवारी रोजी ८:३० च्या सुमारास गोविंद शिंदे यास फोन करून पती संतोष चव्हाण कोठे आहेत असे विचारले असता त्याने फिर्यादीला पती संतोष कालच माझ्यापासून गेलेले असून, मी झोपलो आहे. उद्या सकाळी मला फोन करा म्हणून फोन बंद केला.
त्यानंतर पोलिसांनी फिर्यादी पत्नी स्वाती चव्हाण हिची खर्डी येथील घरी समक्ष भेट घेऊन काल रविवार १९ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास पती संतोष चव्हाण याचा फोटो दाखवले व कमलापूर येथील हॉटेलच्या पाठीमागे आंब्याच्या बागेत त्याचा खून झाल्याचे सांगितले असे फिर्यादीत म्हटले आहे.