वयाच्या 50व्या वर्षीही माधुरी दीक्षित दिसते तितकीच सुंदर, जाणून घ्या काय आहे तिच्या सौंदर्याचे रहस्य
माधुरी दीक्षितच्या सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागले आहे. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की माधुरी वयाच्या 50 व्या वर्षी देखील इतकी तरुण कशी दिसते. तिची त्वचा देखील निरोगी आणि चमकदार कशी आहे? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. जर तुम्हाला ही तिच्यासारखी त्वचा हवी असेल तर माधुरीने स्वतः तिच्या निरोगी आणि चमकदार त्वचेचे रहस्य तिच्या एका व्हिडिओमध्ये उघड केले आहे.
या व्हिडिओमध्ये माधुरीने तिच्या सकाळ आणि संध्याकाळच्या स्किन केअर रुटीन बद्दल सांगितले आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील दिल्या आहेत. तिने भर दिला आहे की योग्य स्किन केअर रूटीन असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासोबतच ती म्हणाली आहे की त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी योग्य आहार आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. पुढे तिने सांगितले आहे की या सगळ्याचा तुमच्या त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होतो. भरपूर पाणी प्या जेणेकरून तुमची त्वचा आणि शरीर हायड्रेट राहील असा सल्लाही तिने दिला आहे.
माधुरी दीक्षितचे सकाळचे स्किन केअर रूटीन
माधुरी दीक्षित तिच्या दिवसाची सुरुवात करताना चांगला क्लिंजर वापरते. यानंतर ती टोनर लावते ती तिच्या त्वचेसाठी गुलाब पाणी सर्वोत्तम टोनर आहे असे सांगते. गुलाब पाणी तिला खूप आवडते असे देखील तिने सांगितले फक्त ते चांगल्या दर्जाचे निवडणे गरजेचे आहे. यानंतर माधुरी दीक्षित व्हिटॅमिन सी सिरम वापरते आणि मग मॉइश्चरायझर तसेच सनस्क्रीन लावते. माधुरीने सल्ला दिला आहे की जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही पाण्याचे टेक्स्चर असलेले मॉइश्चरायझर निवडा. त्याचवेळी जर तुमची त्वचा कोरडी असेल तर जाड क्रीम आधारित मॉइश्चरायझर लावा.
रात्रीचे स्किन केअर रुटीन
रात्री मेकअप काढणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे माधुरीने सांगितले आहे. ती म्हणाली की आपल्यापैकी बरेच जण रोजच्या जीवनात किंवा कुठेतरी बाहेर जाताना मेकअपचा वापर करतात. त्यामुळे तुम्ही तुमचा चेहरा व्यवस्थित स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे. तिने पुढे सांगितले की ती मेकअप काढण्यासाठी क्लिनिंग बाम वापरते. तिच्या चेहऱ्याची मालिश केल्यानंतर ती मेकअप स्वच्छ करते आणि पाण्याने धुते. माधुरी मिसलर पाणी आणि ओले वाइप्स देखील वापरते. तसेच मेकअप वाइप्सवर मिसलर पाणी टाकून चेहरा स्वच्छ करते आणि चेहरा स्वच्छ झाल्यावर पुन्हा खात्री करून घेते की चेहऱ्यावर कुठेही मेकअप राहिला नाही.
रात्री झोपण्यापूर्वी माधुरी करते हे काम
माधुरी दीक्षित चेहऱ्यावरील उरलेली घाण आणि मेकअप क्लिंजरने साफ करते. क्लिंजर नंतर ती टोनर आणि व्हिटॅमिन सू सीरम लावते. माधुरी दिवसातून दोनदा सिरम वापरते. पण तिचे असे देखील म्हणणे आहे की तुम्ही सिरम दिवसातून एकदा लावले तरीही पुरेसे आहे. सिरम लावल्यानंतर ती मॉइश्चरायझर आणि डोळ्याखालील क्रीम वापरते जेणेकरून डोळ्याखालील त्वचा रात्रभर विश्रांती घेते. शेवटी ती तिच्या ओठांना लिप बाम लावून तिची रात्रीची स्किन केअर रूटीन पूर्ण करते.