entertainment

खुशखबर! ‘डीडीएलजे’ पुन्हा प्रदर्शित होणार

येत्या 2 नोव्हेंबर रोजी अभिनेता शाहरुख खानचा 57 वा वाढदिवस आहे. याच निमित्ताने शाहरुखच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे. शाहरुखच्या पठाण चित्रपटाला खास करण्यासाठी आणखी एक उत्तम तयारी करण्यात आली आहे. शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्यातील अनेक सुपरहिट चित्रपटांपैकी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ पुन्हा चित्रपटगृहांमध्ये येणार आहे.

20 ऑक्टोबर 1995 चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे आजही लाखो चाहते आहेत. लॉकडाऊन सोडल्यास हा चित्रपट 27 वर्षांपासून मुंबईच्या मराठी मंदिर चित्रपटगृहामध्ये चालू आहे.
दरम्यान, 2 नोव्हेंबर रोजी शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त मराठा मंदिरव्यतिरिक्त देशभरातील PVR च्या अनेक चित्रपटगृहांमध्ये देखील दाखवला जाणार आहे. सध्या दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, अहमदाबाद, लखनऊ, पुणे आणि सुरतमध्ये 2 नोव्हेंबरच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटांचे अॅडव्हान्स सुरु झाले आहे. तिकिटाची किंमत 100 ते 150 इतकी असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button