top news
ब्रेकिंग! सरकारच्या अडचणी वाढल्या ; आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून एकामागून एक प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत. काही दिवसांपूर्वीच दीड लाख कोटींचा वेदांत प्रकल्प ऐनवेळी गुजरातमध्ये हलवण्यात आला होता. त्यानंतर नागपूरात प्रस्तावित असेलला टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातच्या वडोदऱ्यात हलवण्यात आला आहे.
त्यानंतर आता राज्यातील आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याची माहिती आहे.
नागपूरातील मिहानमधील सॅफ्रन ग्रुपचा विमान आणि रॉकेट इंजिन बनवण्याचा हा प्रकल्प तेलंगणाच्या हैदराबादमध्ये जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तब्बल १ हजार १८५ कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाणार असल्यानं यावरून विरोधक शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे.
सॅफ्रन ग्रुपचे सीईओंची राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर प्रकल्पासाठी जागा न मिळाल्यानं कंपनीच्या सीईओंनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. त्यानंतर आता हा प्रकल्प तेलंगणाच्या हैदराबादमध्ये जाणार असल्याची माहिती आहे.