टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला तालुक्यात वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू

On: April 4, 2025 10:17 AM
Follow Us:

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यात कोळा व कमलापुर येथे झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असल्याची घटना 2 एप्रिल रोजी घडली.अपघातात अमित घुले (वय 30 वर्षे, रा. पाचेगाव खुर्द ता. सांगोला) व व सुरज निषाद (वय 23 वर्षे, रा. मगरघटा ता. बेमेतरा जि. नांदघाट रा. थत्तीसगड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. अपघाताची फिर्याद वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय सांगोला यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.

 

सांगोला पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पहिल्या अपघातात अमित घुले हा अनुसे मळा सांगोला ते मिरज जाणारे रोडवर कमलापुर ता. सांगोला येथे रस्ते अपघातामध्ये गंभीर जखमी झालेने त्यास उपचारास ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे दाखल केले असता तो उपचारापुर्वीच मयत झाला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकाँ भोसले हे करीत आहेत.

त्याचप्रमाणे दुसर्‍या अपघातात सुरज निषाद हा आटपाडी रोड कोळा ता. सांगोला येथे रस्ते अपघातामध्ये जखमी झालेने त्यास उपाचाराकरीता ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे दाखल केले असता तो उपचारापुर्वीच मयत झाला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकाँ भोसले हे करीत आहेत.

 

इतर महत्वाच्या बातम्या 

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाण्याचा शब्द पाळला – चेतनसिंह केदार सावंत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा