टॉप हेडलाईन्स | 4 एप्रिल 2025 | शुक्रवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 

  • नांदेड लगतच्या आलेगांव शिवारात ट्रॅक्टर विहिरीत पडून 7 महिला कामगारांचा मृत्यू, तर 3 महिला जखमी, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांचं अर्थसहाय्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

  • दारुच्या नशेत असलेल्या CISF जवानाच्या भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक; अपघातात महिला ठार, रिक्षाचालकासह 2 मुली जखमी, मुंबईचा वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना

  • विरोधकांचा गोंधळ, गृहमंत्री अमित शाह यांचं आक्रमक भाषण; मध्यरात्री 2.30 वाजता वक्फ विधेयक राज्यसभेतही मंजूर, मतदानावेळी शरद पवारांची अनुपस्थिती

  • जनता दलाचा वक्फ दुरुस्ती विधेयकावर मोदी सरकारला पाठिंबा, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षात खळबळ, संतप्त झालेल्या 6 मुस्लिम नेत्यांनी पक्ष सोडला

  • वसेना ठाकरे गटाचा वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं; म्हणाल्या, मी बोललं की त्यांच्या खूप जिव्हारी लागतं

  • तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलाय, माझ्या नादी लागू नका, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेलांना इशारा

  • अंगूर खट्टे है, संजय राऊतांच्या टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांचा तीन शब्दातच पलटवार

  • राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा धुमाकूळ, पुढील 3 दिवस कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

  • नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, 1297 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान, बळीराजा हवालदिल

  • बॉलिवूडचा ‘भारत कुमार’ काळाच्या पडद्याआड; दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन

  • लखनौविरुद्ध मुंबई सामन्याआधी उडाली खळबळ! रोहित शर्मा अन् झहीर खान यांच्यातील चॅट लीक, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

  • काळजावर दगड ठेवून हार्दिक पांड्याने घेतला मोठा निर्णय! रोहित शर्मा बाहेर

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon