फॅबटेक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची सातव स्टोन कंपनीत निवड

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला : फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अ‍ॅड रिसर्च महाविद्यालयाच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रतिष्ठित सातव स्टोन कंपनी प्रा.लि.मध्ये निवड झाली आहे, अशी माहिती सिव्हील इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रा.शिवानंद माळी यांनी दिली.

सातव स्टोन कंपनी ही बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीने फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॅम्पस मुलाखती आयोजित केल्या होत्या. या मुलाखतींमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांची तांत्रिक कौशल्ये आणि ज्ञान दाखवले. या मुलाखतीच्या आधारे, कंपनीने कु.विजया माने (कमलापूर), समरजीत गडदे (उच्चेठाण), कु.पूजा राऊत (मेडशिंगी), साहिल मणेरी (सांगोला), कु.वैष्णवी लेंडवे (लेंडवे चिंचाळे), कु. रुपाली जाधव(सांगोला),कु.ऐश्वर्या इंगवले (सांगोला), कु.कोमल कोळी (हुलजंती) या विद्यार्थ्यांची निवड केली आहे.

या यशाबद्दल फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.भाऊसाहेब रुपनर, सचिव डॉ.अमित रुपनर,कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय अदाटे, प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे, उप प्राचार्य प्रा.डॉ विद्याराणी क्षीरसागर, ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

इतर महत्वाच्या बातम्या 

सांगोला तालुक्यात वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू

महात्मा बसवेश्वर युवक संघटनेच्या अध्यक्षपदी संदेश पलसे

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon