पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची सांगोला पोलिस ठाण्यास भेट

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला तालुक्यासाठी नविन दोन पोलीस स्टेशनचे प्रस्ताव

सांगोला : सांगोला तालुक्यासाठी महुद व हातीद असे दोन नवीन पोलिस स्टेशनचे प्रस्ताव देण्यात आले आहे. दर शनिवारी पोलिस ठाण्यात तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार असून पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी त्यांच्या तक्रारी घेऊन पोलिस ठाण्यात यावे, दर शनिवारी त्यांच्या तक्रारींचे निराकरण त्यांच्या समोरच करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे काल शुक्रवारी कोल्हापूर दौर्‍यावर होते. नियोजित कोल्हापूर दौर्‍यावर जात असताना त्यांनी सांगोला पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस ठाण्यासह पोलीस वसाहतीची पाहणी करून भीमराव खणदाळे यांना स्वच्छतेच्या बाबतीत सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्यासह सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलीस ठाण्यातील क्राईम विभाग, गोपनीय विभाग, जप्त मुद्देमाल आदी रेकॉर्डसह अन्य रेकॉर्डची तपासणी करण्यात आली.
गुन्ह्याचे तपास लवकरात लवकर लागण्यासाठी पोलिसांना अत्याधुनिक पध्दतीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईल अ‍ॅप ही तयार करण्यात आले असून हे अ‍ॅप लवकरच वापरात येणार आहे. त्याचप्रमाणे नवीन पोलीस स्टेशनच्या वसाहतीचे प्रस्तावही देण्यात आला असून वाढत्या चोरांच्या अनुषंगाने रात्रग्रस्त वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आले असून तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेच पाहिजे, याची गरजच राहिलेली नाही. क्यू आरकोड स्कॅन करून तक्रार नोंदवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असून शाळा, महाविद्यालये, वर्दळीच्या ठिकाणी टवाळखोरांकडून मुली, महिलांची छेड काढली जाते. चोरटेसक्रिय असतात. अशावेळी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातही क्यूआर कोड दर्शनी भागात बसवले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon