टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात उद्या कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हचे आयोजन

On: May 11, 2026 10:34 AM
Follow Us:

सांगोला (प्रतिनिधी):- डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय व अ‍ॅक्सिस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हचे उद्या मंगळवार दि.12 मे रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुसा मुलाणी यांनी दिली.

सदर कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हसाठी महाविद्यालयातील सर्व विभागातील पदवीच्या तृतीय वर्षास असणार्‍या सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे. कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हसाठी येताना सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी ठीक 10:30 वाजता युनिफॉर्म घालून सोबत आयडेंटिटी कार्ड घेऊन महाविद्यालयात उपस्थित राहावे.

सदर कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन संस्था अध्यक्ष डॉ.अनिकेत देशमुख यांनी केले. अधिक माहितीसाठी प्लेसमेंट ऑफिसर प्रा.निसार शेख मो-9766525782 यांचेशी संपर्क साधावा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा