टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला: एसटी बस व पिकअपचा भीषण अपघात; पिकअप चालकाचा मृत्यू तर अनेक प्रवासी जखमी

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यातील चिंचोली तलावाजवळ शुक्रवारी (दि. 9 मे) पहाटे भीषण अपघात झाला. सांगोला-महुद रोडवरील इंगोले यांच्या घराजवळ एसटी बस आणि महिंद्रा पिकअप यांची समोरासमोर धडक होऊन पिकअप चालकाचा मृत्यू झाला, तर काही प्रवासी जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एसटी बस ही पुण्याकडे जात असताना पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास पिकअप ने भरधाव वेगात येत रोडची परिस्थिती न पाहता बसला जोरदार धडक दिली. या अपघातात पिकअप चालक पांडुरंग गायकवाड (वय 28, रा. कडलास, ता. सांगोला) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघातात एसटी बसमधील श्रीमती श्रद्धा पोरे, प्रवासी अश्विनी इंगोले यांच्यासह इतर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच दोन्ही वाहनांचे मिळून अंदाजे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी चैतन्य व्हरगर (रा. महीम, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली असून सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका/1242 बनसोडे हे करीत आहेत.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा