Raj Thackeray MNS Gudhi Padwa 2025: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज, रविवारी सायंकाळी दादरच्या शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज, रविवारी सायंकाळी दादरच्या शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार आणि कुणाला टीकेचे लक्ष्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
लोकसभा निवडणुका न लढवता मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर, विधानसभेत मात्र मनसेने स्वबळावर निवडणूक लढवली. मात्र, त्यात पक्षाचा एकही आमदार जिंकू शकला नाही. याविषयावर आपण गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलणार असे राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात येत होते.
मनसेकडून मेळाव्याची जय्यत तयारी
गुढीपाडवा मेळाव्यासाठी मोठे व्यासपीठ उभारण्यात आले असून मैदानात चार मोठे एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. पाण्याचे टैंकर्स, पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मोबाइल टॉयलेट, रुग्णवाहिका, फायर इंजिन असतील. खबरदारीचा उपाय म्हणून शुश्रूषा, हिंदुजा हॉस्पिटल येथे आपत्कालीन खाटा आरक्षित करून ठेवल्या आहेत. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार आणि कुणाला टीकेचे लक्ष्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Maharashtra Navnirman Sena (MNS)
इतर महत्वाच्या बातम्या
दररोज सकाळी हळदीचे पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात?