टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Petrol-Diesel Price: 25 ते 28 रुपयांनी भडकणार पेट्रोल-डिझेल? सरकारचे ते मोठे संकेत

Follow Us:

Petrol-Diesel Price Hike: आखाती युद्धामुळे जगात पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या युद्धाला विराम असला तरी होर्मुझ स्ट्रेटवरून सध्या मोठा वाद सुरू आहे. त्यामुळे पुढील महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 25 ते 28 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय आहे सरकारचे उत्तर?

Petrol-Diesel Price: 25 ते 28 रुपयांनी भडकणार पेट्रोल-डिझेल? सरकारचे ते मोठे संकेत

Petrol, diesel prices: मध्य-पूर्वेतील युद्धाचा जगाच्या इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. अमेरिका आणि चीनसारख्या पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी वाढ झाली आहे. भारताच्या इंधन पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे. ताज्या काही अहवाल आणि दाव्यानुसार, युद्धाला तात्पुरता विराम लागला असला तरी होर्मुझ समुद्रधुनीवर तणाव कायम आहे. इराण आणि अमेरिकेत दबाव तंत्र सुरू आहे. त्याचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होईल. त्यामुळे येत्या काही महिन्यात देशातंर्गत पेट्रोल आणि डिझेलची किंमत 25 ते 28 रुपयांपर्यंत वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर आता केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.

क्रूड ऑईलची किंमत 100 डॉलर

इराण युद्ध आणि होर्मुज संकटामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. कच्चा तेल्याच्या किंमती भडकल्या आहेत. जागतिक बाजारात क्रूड ऑईल 70-75 डॉलर प्रति बॅरलवरून या किंमती 100 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. कच्चा तेलाच्या किंमती 115 डॉलरपर्यंत पोहचल्या आहेत. अमेरिका, युरोप, ब्रिटेन, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेशासह अनेक देशांना याचा मोठा फटका बसला आहे. या देशात इंधनाचे दर भडकले आहे. पण भारतात इंधनाचे दर सरकारने अजूनही स्थिर ठेवले आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही.

देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका असल्याने या किंमती सरकारने वाढू दिल्या नाहीत असा दावा करण्यात येत होता. काल तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आता येत्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यावर मोदी सरकारकडून उत्तर आले आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाचे उत्तर काय?

Kotak Institutional Equity ने एका अहवालात दावा केला होता की, विधानसभा निवडणूक संपल्यानंतर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होऊ शकते. इंधनाचे दाम 25-28 रुपये प्रति लिटरने वाढू शकतात असा दावा करण्यात आला आहे. निवडणुकीमुळे सरकारने किंमती भडकू दिल्या नसल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर आता केंद्र सरकारने उत्तर दाखल केले आहे. त्यानुसार, अशा अनेक चुकीची वृत्त समोर येत आहेत. त्यात तथ्य नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने हे दावे खोडून काढले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सराफा बाजारात मोठी पडझड! सोनं तब्बल 2300 रुपयांनी स्वस्त; 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार?

डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा, युद्धाबाबत संपूर्ण जगाला दिली ती खुशखबर; अखेर…

भाजपने विधान परिषदेसाठी 30 नावं दिल्लीला पाठवली, पण वरिष्ठ नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य, ‘ती’ अट कोणाकोणाचा पत्ता कापणार?

Amol Mitkari on Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या अपघाताआधी अघोरी प्रकार; सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठानमध्ये जाण्याआधी तिथंही पूजा, बोकड उलटं टांगलं अन्….; अमोल मिटकरींच्या पोस्टने खळबळ

Today Gold Price : सराफा बाजारात मोठी घडामोड, सोन्याचे दर खाली, आज 10 ग्रॅम सोनं…

अंगावर थरकाप आणणारी घटना, होर्मुज खाडीत भारताच्या दिशेने निघालेल्या जहाजावर गोळीबार, थेट व्हाईस कॅप्टन..