टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

BJP MLC Election Names : महाराष्ट्र भाजपकडून विधानपरिषदेसाठी 30 नावं केंद्रीय भाजपकडे, केशव उपाध्ये ते रवी अनासपुरेंच्या नावाचा समावेश, राष्ट्रवादीकडून लढलेल्या नेत्याचं नाव यादीत

BJP MLC Election Names : महाराष्ट्र भाजपनं विधानपरिषद निवडणुकीसाठी 30 नाव केंद्रीय नेतृत्त्वाकडे पाठवली आहेत. विशेष म्हणजे यामध्ये केशव उपाध्ये यांच्या नावांचा समावेश आहे.

मुंबई: महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र भाजपकडून विधान परिषदेच्या जागांसाठी यादी दिल्लीच्या नेतृत्वाला पाठवण्यात आली आहे.  केंद्रीय नेतृत्वाला भाजपकडून ३० जणांची यादी पाठवण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांपैकी भाजपच्या वाट्याला 5 जागा येणार आहेत. भाजपकडून 5 नावांसाठी 30 जणांची यादी केंद्रीय नेतृत्वाला सोपवण्यात आली आहे.

भाजपनं पाठवेलली नाव :

माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी अशी नावं यादीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

नावं दिल्ली पाठवण्यापूर्वी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक

महाराष्ट्र भाजपकडून कोअर कमिटीची विधानपरिषदेच्या उमेदवारांच्या नावांची यादी दिल्लीला पाठवण्यापूर्वी बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानपरिषदेच्या उमेदवारांच्या नावांची चर्चा करण्यात आली.महाराष्ट्र भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी निकष ठरवण्यात आले.सकाळी बैठक झाल्यानंतर पुन्हा आज रात्री 10 वाजता भाजपच्या कोअर कमिटीची वर्षा निवासस्थानी बैठक घेण्यात येणार होती.

कालच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नावांवर खलबतं करण्यात आली होती.आज उर्वरित विभागातील नावांवर चर्चा होणार आहे.  प्रामुख्याने संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. आज सकाळी झालेल्या विधान परिषदेच्या बैठकीत इच्छुक उमेदवाराच्या नावांवर विभागवार चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी एक जागा प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झाली होती. त्या जागी भाजपकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

भाजपने विधान परिषदेसाठी 30 नावं दिल्लीला पाठवली, पण वरिष्ठ नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य, ‘ती’ अट कोणाकोणाचा पत्ता कापणार?

Vidhanparishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे फक्त एक जागा, पण 6 जण रेसमध्ये, कोणाकोणाची नावं चर्चेत?

उद्धव ठाकरेंना समर्थन आहे पण… विधानपरिषद निवडणुकीवर काँग्रेसची मोठी अट, वडेट्टीवार म्हणाले…

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट! eKYC साठी उरले केवळ आठ दिवस, 1500 रुपये होतील कायमचे बंद

Baramati Byelection 2026 Sunetra Pawar: अजित पवार नाहीत, शरद पवारही आजारी; सुनेत्रा पवारांचा कंठ बोलताना दाटून आला, म्हणाल्या…

विजयदादा मुख्यमंत्र्याच्या भेटीला, मंत्री विखे पाटील पडले पाया, रणजितसिंहंना पुन्हा विधानपरिषद मिळणार का?