टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला येथील पिग्मी एजंट लूट प्रकरणाचा लागला छडा: पोलीसांकडून मुख्य आरोपीस अटक

गुन्हयातील मुख्य आरोपीत शेखर कारंडे वय 20 वर्षे मुळ रा. मठाचीवाडी फलटण ता.फलटण जि. सातारा सध्या रा.सोनंद ता. सांगोला जि. सोलापुर यास बुद्धी कौशल्याने व चातुर्याने आरोपी यास फलटण शहर पोलीस ठाणे ता.फलटण जि. सातारा येथुन ताब्यात घेतले.

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला शहरात 3 मार्च 2025 रोजी रात्री सांगोला मिरज रस्त्यावरून माउली वॉशींग सेंटरच्या जवळुन राउत मळयाकडे जाणारे ओढ्याचे अलीकडील बाजुला असणार्‍या रस्त्यावर पिग्मी एजंटला 4 अनोळखी इसमांनी अडवुन डोळयात मिरची पुड टाकुन, दुखापत करून, त्यांचेकडील 25000/- रोख रक्कम असलेली बॅग जबरीने चोरून नेली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यास सांगोला पोलीसांना यश आले असून मुख्य आरोपीस अटक करण्यात पोलीसांना यश आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांनी दिली. शेखर कारंडे (वय 20 वर्षे मुळ रा. मठाचीवाडी फलटण ता.फलटण जि. सातारा सध्या रा सोनंद ता सांगोला जि सोलापुर) यास फलटण शहर पोलीस ठाणे ता फलटण जि सातारा येथुन ताब्यात घेतले असून मा. न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

सांगोला पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 03/03/2025 रोजी रात्री 09:40 ते 09:50 वा दरम्यान मौजे सांगोला येथील सांगोला शहरातुन सांगोला मिरज रस्त्यावरून माउली वॉशींग सेंटरच्या जवळुन राउत मळयाकडे जाणारे ओडयाचे अलीकडील बाजुला असणा-या कच्या रस्तावर आबासो अशोक राऊत (राऊत मळा, सांगोला) हे सांगोला शहरातुन पिग्मीची रक्कम जमा करून त्यांचे राहते घरी जात असताना चार अनोळखी इसमांनी त्यांना अडवुन त्यांचे डोळयात मिरची पुड टाकुन, दुखापत करून, त्यांचेकडील 25000/- रोख रक्कम असलेली बॅग जबरीने चोरून नेल्याने त्यांचे फिर्यादी वरून सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.गुन्हयाचा तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जगताप हे करीत आहेत.

सदरचा गुन्हा हा जाणीवपुर्वक दुखापत करून, जबरी चोरीचा गंभीर स्वरूपाचा असल्याने तात्काळ पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाणे कडुन दोन पोलीस पथके नेमण्यात आली. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील सपोनि सचिन जगताप, पोउप. निरीक्षक व्ही. व्ही. माहूरकर, पोहवा वजाळे, पोहेकॉ पलुसकर, पोकॉ पांढरे, पोकॉ आवटे, पोकॉ शिंदे, पोहवा पठाण यांनी गोपणीय बातमीदारमार्फत खात्रीशीर माहीती प्राप्त करून गुन्हयातील मुख्य आरोपीत शेखर कारंडे वय 20 वर्षे मुळ रा. मठाचीवाडी फलटण ता.फलटण जि. सातारा सध्या रा.सोनंद ता. सांगोला जि. सोलापुर यास बुद्धी कौशल्याने व चातुर्याने आरोपी यास फलटण शहर पोलीस ठाणे ता.फलटण जि. सातारा येथुन ताब्यात घेतले. त्यास गुन्हयाबाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता असता आरोपीत याने गुन्हयाची कबुली दिल्याने व आरोपीचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास दि.06/03/2025 रोजी अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपीस मा. न्यायालामध्ये हजर केले असता मा. न्यायालयाने अटक आरोपी यास 05 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now