टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला तालुक्याच्यावतीने ना.जयकुमार गोरे यांचा उद्या भव्य नागरी सत्कार

सांगोला(प्रतिनिधी):-भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांचा उद्या गुरुवार दि.3 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगोला तालुक्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी सायंकाळी 4 वाजता महात्मा फुले चौकातून रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीनंतर भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. सत्कार सोहळ्याप्रसंगी सांगोला तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या सत्कार सोहळ्यास सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सर्व पक्षीयांच्यावतीने करण्यात आले आहे.

 

आणखी वाचा

Solapur News: पाण्याच्या काटेकोर नियोजनामुळे 25 एप्रिलपर्यंत उजनी धरण वजा पातळीत जाणार, 15 मेपर्यंत कालव्यातून अखंड पाणी मिळणार

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now