टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Silver Price : चांदीचा फुगा फुटला, उच्चांकाच्या तुलनेत चांदी 2.43 लाखांनी स्वस्त, सोन्याचे दर घसरले, 24 कॅरेट सोन्याचा दर जाणून घ्या

On: November 15, 2026 7:53 PM
Follow Us:

Gold Silver Price : सोने आणि चांदीच्या दरात सातत्यानं घसरण सुरु आहे. चांदी दिवसेंदिवस स्वस्त होत आहे. गेल्या आठवड्यात चांदीचा दर 8000 रुपयांनी कमी झाला आहे.

1/5
Gold Silver Rate नवी दिल्ली :  सोने आणि चांदीच्या दरात सातत्यानं बदल सुरु आहेत. गेल्या आठवड्यात मल्टी कमोडिटी एक्सचेंज पासून सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळाले. वायदेबाजारात चांदीचा दर उच्चांकाच्या तुलनेत 2.43 लाख रुपयांनी कमी झाला आहे. दुसरीकडे 24 कॅरेट सोन 5400 रुपयांनी या पाच दिवसात स्वस्त झालं आहे.

2/5
चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळतेय. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 4 डिसेंबरच्या एक्सपायरीच्या वायद्याचे एक किलो चांदीचा दर 1,76,543 रुपयांवर आहे. तर, 6 नोव्हेंबरला हा दर 1,84,787 रुपये प्रति किलो होता. म्हणजेच या आठवड्यात चांदी  8,244 रुपये प्रति किलोनं स्वस्त झाली.

3/5
जानेवारी महिन्यात चांदीच्या दरानं 4,20,048  रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर अमेरिका आणि इराण युद्ध सुरु झाल्यानं सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीच्या दरातील घसरण कायम आहे. एमसीएक्सवरील चांदीचा एक किलोचा दर 1,76,543 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच चांदी उच्चांकावरुन 2,43,505 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

4/5
चांदीप्रमाणं सोन्याच्या दरात देखील घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर 5417  रुपयांनी कमी झाला आहे. 4 डिसेंबरला संपणाऱ्या वायद्याचे सोन्याचे दर नोव्हेंबरला 1,42,167 रुपयांवर बंद झाले होते. शुक्रवारी हा दर 1,36,750 रुपयांवर पोहोचला आहे.

5/5
एमसीएक्सप्रमाणं सराफा बाजारात देखील सोने आणि चांदीच्या दरात बदल झालेत. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून सोने आणि चांदीचे दर जारी केले जातात. आयबीजेएच्या वेबसाईटनुसार सराफा बाजारात सोन्याचा दर 4 दिवसात 5643 रुपयांनी कमी झाला आहे. 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 1,41,452 रुपयांवरुन कमी होत 1,35,809 रुपयांवर आला आहे. एक किलो चांदीचा दर 1,82,868 रुपयांवरुन 4,868 रुपये कमी होत 1,78,000 रुपये  प्रति किलो वर आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

5.28 लाख रुपये किंमत अन् 26 किमी मायलेज! 13,720 लोकांनी घेतलेली मारुतीची ‘ही’ आहे बजेटफ्रेंड्ली कार

Rohit Pawar On Ajit Pawar : अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? 16 तारखेला राजकीय बॉम्ब फुटणार? रोहित पवार पत्रकार परिषदेत कोणता खुलासा करणार?

मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!

दिवसभरातील महत्त्वाच्या हेडलाईन्स चा वेगवान आढावा | 13 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार

दणादण का कोसळत आहेत सोन्या-चांदीचे भाव? मोठं कारण आलं समोर; हीच ती संधी…

Heavy Rain Alert : वारं फिरलं, आता थेट 10 दिवस तडाखेबाज पाऊस, 184 KM ताशी…