मृतांमध्ये रांझणी येथील दोन व अनवलीतील दोघांचा समावेश!
सोलापूर : जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात नवीन विहिरीचे काम सुरू असताना अचानक विहिरीचा कठडा कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातात मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेत मंगेश मोरे, सिद्धेश्वर घाडगे, तानाजी घोडके, आबा घोडके हे चार लोकांचा मृत्यू झाला आहे. आंबे गावातील शेतकरी निवास शिंदे यांच्या शेतात नवीन विहीर खोदणे व बांधकामाचे काम सुरू होते. नेहमीप्रमाणे काही मजूर विहिरीत उतरून आपले काम करत होते. मात्र, यादरम्यान अचानक विहिरीचा कठडा कोसळला आणि विहिरीत काम करत असलेले सर्व मजूर मोठ्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले.

ही भीषण दुर्घटना समजताच आंबे गावातील ग्रामस्थांनी कोणतीही वेळ न घालवता तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्वतः बचाव कार्य सुरू केले. परंतु, विहिरीत मोठ्या प्रमाणावर माती कोसळल्यामुळे मजुरांना सुखरूप बाहेर काढताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व प्रशासन देखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा कोसळल्याने बचावकार्यात अडचणी
ही घटना समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा कोसळल्याने बचावकार्यात अडचणी आल्या. या दुर्घटनेत चारही मजुरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात मंगेश मोरे आणि सिद्धेश्वर घाडगे, तसेच तानाजी घोडके आणि आबा घोडके हे कामगार अडकले आहेत.











