टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Latur DCC Bank Election Result 2026: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल जाहीर; देशमुखांच्या सहकार पॅनला स्पष्ट बहुमत, पाहा विजयी उमेदवारांची यादी

On: November 16, 2026 12:44 PM
Follow Us:

Latur Jilha Bank Election Result 2026: लातूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत 14 जागी काँग्रेस नेते धीरज देशमुखांचे सहकार पॅनल विजयी झालं आहे. तर पाच जागेवर भाजपच्या परिवर्तन पॅनेलने विजय मिळवला आहे.

Latur District Bank Election 2026 : लातूर जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालासंदर्भात (Latur District Bank Election Result 2026) एक मोठी अपडेट समोर आली आहे. लातूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत (Latur District Bank Election) 14 जागी काँग्रेस नेते धीरज देशमुखांचे सहकार पॅनल विजयी झालं आहे. तर पाच जागेवर भाजपच्या परिवर्तन पॅनलने विजय मिळवला आहे. काँग्रेस नेते धीरज देशमुखांचं (Dhiraj Deshmukh) सहकार पॅनल जरी सत्तेत आलं असले तरी भाजपची या निवडणुकीच्या निकालातील जोरदार मुसंडी दिसून आलीय. (Latur Jilha Bank Election Result 2026)

दरम्यान, सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या निलंगा येथून भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांचे बंधू आणि परिवर्तन पॅनलचे उमेदवार अरविंद पाटील निलंगेकर यांनी मोठा विजय मिळवला आहे. अरविंद पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या काकी संगीता अशोक पाटील निलंगेकर यांचा पराभव करत पहिल्यांदाच लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये प्रवेश केला आहे.

19 जागे पैकी 14 ठिकाणी काँग्रेसच्या सहकार पॅनलने विजय, ‎कुणा–कुणाचा विजय (Latur District Bank Election Result 2026) 

‎ दरम्यान, 19 जागे पैकी 14 ठिकाणी काँग्रेसच्या सहकार पॅनलने विजय मिळवला आहे. पाच ठिकाणी परिवर्तन पॅनल विजय मिळवला आहे. यात संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर विजयी झाले आहेत. तर त्यांनी त्यांची काकी संगीता अशोक पाटील निलंगेकर यांचा पराभव केलाय. तर यात भाजपचे आमदार रमेश कराड यांचे चिरंजीव ऋषिकेश कराड हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे अशोक गोविंदपुरकर यांचा पराभव केला आहे. सोबतच सहकार पॅनलचे धीरज देशमुख विजय झाले आहेत. स्वर्गीय माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांच्या कन्या प्रीती भोसले या विजयी झाल्या आहेत. सहकार पॅनलकडून त्यांनी निवडणूक लढवली होती.‎ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे जावई हेमंत जाधव हे सहकार पॅनल मधून विजय झाले आहे.

दरम्यान, मत्स्य आणि हाउसिंग मतदारसंघातून सहकार पॅनलचे जयेश विश्वंभर माने विजयी झाले आहे. 45 पैकी 35 मतं मिळवत जयेश विश्वंभर माने यांनी विजय मिळवला आहे. सोबतच परिवर्तन पॅनलचे भगवानदादा पाटील पटवारी हे देखील विजयी झाले आहे. तर दुसरीकडे उदगीर सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनलच्या प्रीती चंद्रशेखर भोसले यांनी 10 मतांनी विजयी गुलाल उधळला आहे. तर सहकार पॅनलचे संतोष पाटील हे देखील या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

Latur Result 2026 : संगीता पाटील निलंगेकर यांचा पराभव, अरविंद पाटील निलंगेकरांचा पहिल्यांदाच लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये प्रवेश

दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या लातूरमधील (Latur) जिल्हा बँकेची निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. जिल्हा बँकेतील (DCC) संचालकांच्या 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी 99.4 टक्के मतदान झालं होतं. येथे 999 पैकी 993 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असता, या मतदानाची मतमोजणी आज होत आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत (Election) महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल आणि महायुतीचे परिवर्तन पॅनेल यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस नेते धीरज देशमुख आणि भाजप नेते तथा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना अरविंद पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या काकी संगीता अशोक पाटील निलंगेकर यांचा पराभव करत पहिल्यांदाच लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये प्रवेश केला आहे.

सहकार पॅनल विजयी उमेदवार

हेमंत जाधव ,लातूर

प्रीती भोसले, उदगीर

आशिष पाटील राजूरकर,जळकोट

संतोष पाटील, चाकुर

धीरज देशमुख,

जगन्नाथ पाटील

जयेश माने

सर्जेराव मोरे

विवेक सिरसाठ

अविनाश जाधव

शेषेराव हाके

चंद्रशेखर दंडीमे

शितल पाटील

गीतांजली लांडगे

(एकूण 14 विजयी)

परिवर्तन पॅनल विजयी उमेदवार

अरविंद पाटील निलंगेकर
अतुल गंभीरे
भगवानराव पाटील तळेगावकर
ऋषिकेश कराड

शोभा पवार

(एकूण -05 विजयी) 19 पैकी 19 निकाल जाहीर

4 जागा बिनविरोध (Latur District Bank Election Result 2026)

दरम्यान, जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण 19 जागा असून, त्यापैकी चार जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित 15 जागांसाठीची मतमोजणी होत असून यात कोण बाजी मारणार याकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागलंय.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Pandharpur Ambegaon Well Collapse: विहिरीच्या मोजमापासाठी उतरले, अचानक ढिगारा कोसळल्याने अडकले; 24 तासांनी 4 मजूरांचे मृतदेह सापडले, पंढरपुरातील आंबेगावातील सुन्न करणारी घटना

अखेर आतली बातमी फुटलीच? विलिनीकरणावर विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान, कुणाला मंत्रिपद…

मोठी बातमी! दिल्लीत घडामोडींना वेग; सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेलांमध्ये बैठक

NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर ‘त्या’ 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु

Heavy Rain Alert : वारं फिरलं, आता थेट 10 दिवस तडाखेबाज पाऊस, 184 KM ताशी…

Mudra Loan: विना हमी 20 लाखांचं कर्ज मिळणार, मोदी सरकारचा योजनेत मोठा बदल, काय आहे अपडेट?