टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Solapur News: पाण्याच्या काटेकोर नियोजनामुळे 25 एप्रिलपर्यंत उजनी धरण वजा पातळीत जाणार, 15 मेपर्यंत कालव्यातून अखंड पाणी मिळणार

Solapur News: शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी असून ऐन उन्हाळ्यात शेतातील पिकांना मुबलक पाणी यामुळे देता येणार आहे.

सोलापूर: उजनीच्या काटेकोर नियोजनामुळे यावर्षी शेतकऱ्यांना 15 मे पर्यंत कालव्यातून अखंड पाणी सुरू राहणार असून साधारण 25 एप्रिलपर्यंत उजनी धरण वजा पातळीत जाईल. शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी असून ऐन उन्हाळ्यात शेतातील पिकांना मुबलक पाणी यामुळे देता येणार आहे. सध्या उजनी धरणात एकूण 77 टीएमसी एवढे पाणी असून जिवंत साठ्यात 13.41 टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. आज धरणात 25% एवढा पाणीसाठा असल्याने यंदाचा उन्हाळा शेतकऱ्यांसाठी सुखदायी ठरणार आहे.

उजनी धरणातून सीना माढा उपसा सिंचन योजना, भिगा उपसा सिंचन योजना आणि बोगद्यातून पाणी सोडणे सुरू आहे. आजची पाण्याची परिस्थिती पाहता साधारण 25 एप्रिल पर्यंत उजनी धरण हे शून्य पातळीला पोचणार असून या वेळेला बोगद्यासह उपसा सिंचन योजनेतून पाणी जाणे बंद होणार आहे. मात्र मुख्य कालव्यातून 5 मार्चपासून सुरू झालेले आवर्तन हे आता 15 मे पर्यंत अखंड सुरू ठेवण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू असल्याने शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी असणार आहे.

सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून जवळपास सहा टीएमसी एवढे पाणी सोडावे लागणार असून अद्याप महापालिकेकडून मागणी न आल्याने हे पाणी नेमके कधी सोडायचे याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र सोलापूर शहराला पाणी सोडल्यास पुन्हा कालव्यातून पाणी सोडणे अवघड असल्याने सध्या सुरू असलेले कालव्याचे आवर्तन हे 15 मे पर्यंत अखंड सुरू ठेवण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

सध्याचे पाण्याचे नियोजन पाहता 25 एप्रिलच्या दरम्यान धरण वजा पातळीत जाण्यास सुरुवात होणार असून वजा 20 टक्क्यापर्यंत कालव्यातून आवर्तन देता येत असल्याने यंदा शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळणार नाहीत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्येच धरण वजा पातळीला गेल्याने धरणाने वजा 60 इतकी इतिहासातील नीचांकी पातळी गाठली होती. यावेळी मात्र सुरुवातीपासूनच पाण्याचे नियोजन चांगले झाल्याने आता पिण्यासाठी व शेतीसाठी दोन्हीला पुरेल एवढा पाणीसाठा उजनी धरणात आहे. यामुळे काही शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

IMD Weather Forecast : महाराष्ट्रातील पावसाचे सर्व अपडेट्स, शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी

Sunita Williams : अंतराळातून कसा दिसतो भारत ? सुनिता विल्यम्स म्हणाल्या..

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, अमेरिकन लष्करी तळावर हल्ले

Manoj Jarange Patil Hunger Strike : रखरखत्या उन्हात उपोषण, ना अन्न-पाणी ना चप्पल, बळी गेल्यास सरकार जबाबदार; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट  

चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या

Mount Everest: एव्हरेस्ट शिखरावर विक्रमी चढाई केली, पण उतरताना आक्रीत घडलं; दोन भारतीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी अंत

कोणत्याही क्षणी होऊ शकतो इराणवर मोठा हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय..