टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला तालुक्यातील प्रलंबित जमीन मोजणी प्रकरणांना लवकरच गती; आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

On: April 1, 2026 10:08 AM
Follow Us:

सांगोला :- सांगोला तालुक्यात भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जमीन मोजणीची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असल्यामुळे शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मोजणीसाठी अर्ज करूनही महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेर्‍या माराव्या लागत होत्या. यामुळे शेतजमिनींच्या हद्दींबाबत वाद निर्माण होऊन जमीन खरेदी-विक्री, बँक कर्ज प्रस्ताव तसेच इतर प्रशासकीय कामांमध्ये अडथळे निर्माण होत होते.

या गंभीर प्रश्नाची दखल घेत सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 मध्ये कपात सूचना क्रमांक 1195 द्वारे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या ठोस व प्रभावी मांडणीमुळे शासनाने या मागणीची सकारात्मक दखल घेतली असून लवकरच त्यावर ठोस कार्यवाही होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याअंतर्गत सांगोला तालुक्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच भूमी अभिलेख कार्यालयात आवश्यक त्या प्रमाणात कर्मचारी व तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने कामकाजाला गती मिळणार आहे.

या निर्णयामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार असून जमीनविषयक व्यवहार अधिक पारदर्शक व सुलभ होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना वारंवार कार्यालयात जावे लागण्याची गरज कमी होऊन प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सांगोला तालुक्यातील हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा