पीएम किसान योजनेत मोठा बदल; घरातील या सदस्यांचा पत्ता कट, बनवाबनवी करणारे रडारवर, नवीन नियमावली वाचली का?
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत मोठा बदल (PM Kisan Yojana Big Changes) झाला आहे. या योजनेतील बनवाबनवी करणारे रडारवर आले आहेत. नवीन नियमानुसार, घरातील या सदस्यांचा पत्ता लाभर्थ्यांच्या यादीतून गायब होणार आहेत. शेतकर्यांना सध्या 19 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. हा हप्ता या महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापूर्वीच ही मोठी अपडेट समोर आली आहे. नियमात मोठा बदल झाल्याचे समोर येत आहे.
घरात एकालाच मिळणार लाभ
यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला देण्यात येणार आहे. त्यासाठी केवायसीची मदत घेण्यात येईल. पडताळणीत एकाच घरातील इतर सदस्यांना लाभ मिळाल्याचे आढळल्यास त्यांना दणका देण्यात येईल. कुटुंबातील इतर सदस्यांचा पत्ता कट होईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी 2019 पूर्वी जमीन खरेदी करणाऱ्यांना मिळणार आहे.
केंद्र सरकारची नवी नियमावली
पीएम किसान योजनेतंर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर एकालाच लाभ घेता येईल. इतर सदस्यांचा पत्ता कट करण्यात येणार आहे. पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली आली आहे. यामध्ये अनेक बदल झाल्याचे दिसून आले.
1. सर्वात मोठा बदल म्हणजे कुटुंबातील एकाच व्यक्तीला PM Kisan Yojana चा लाभ घेता येईल.
2.आयकर भरणारा नोकरदार, अल्पभूधारक यांना लाभ नाही
3.अर्जाची छाननी प्रशासन हाती घेणार आहे
4.एकाच कुटुंबातील अधिक व्यक्ती लाभ घेत असल्याचे लक्षात आले तर इतरांचा पत्ता कट होईल
ई-केवायसीशिवाय हप्ता जमा होणार नाही
सरकारच्या गाईडलाईन्सचे योग्य पालन केले नाही तर 19 वा हप्ता खात्यात जमा होणार नाही. पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकर्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. नियमानुसार ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.
वर्षाला 6 हजारांची आर्थिक
केंद्र सरकार दरवर्षी 6 हजारांची आर्थिक मदत शेतकर्यांना देते. ही रक्कम पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत DBT, थेट लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. शेतकर्यांच्या खात्यात दर चार महिन्याला 3 हप्त्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात. सध्या या योजनेत एकूण 18 हप्ते जमा करण्यात आले आहे. तर आता शेतकर्यांना 19 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे.