maharashtrapoliticaltop news

मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता

परभणी- परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा ताणलेल्या घटनांनंतर 50 जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकाचा कारागृहातच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. सोमनाथ सुर्यवंशी असे 35 वर्षीय मृत तरुणचे नाव आहे. कारागृहातच या तरुणाचा मृत्यू झाल्याने शहरात पुन्हा अस्वस्थता आहे. तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नक्की झाले काय?

परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा कारागहातच मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सोमनाथ सुर्यवंशी असे ३५ वर्षीय मयत तरुणचे नाव असून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणास मृत घोषित केले. या घटनेने परभणीत पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

Related Articles

Back to top button