टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

सांगोला / प्रतिनिधी: सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित, सांगोला महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती दि. 28 मे 2025 रोजी साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ. सुरेश भोसले यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करून, प्रतिमेस पुष्प्हार अर्पण केला.

सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर गावात झाला होता. तरुणपणापासूनच त्यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात संघर्ष करण्याचा निर्धार केला. १९०९ मध्ये त्यांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे ग्रंथलेखन करून इतिहासाची नवीन मांडणी केली. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती.

ब्रिटिश सत्तेविरोधातील कटात सहभाग असल्यामुळे त्यांना अटक झाली आणि त्यानंतर अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये कठोर कारावास भोगावा लागला. तुरुंगातील त्यांचे अनुभव आणि विचार पुढे ‘माझी जन्मठेप’ या आत्मचरित्रात उलगडले गेले. असे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. प्रकाश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. ए. एम. पवार व श्री. बाबासो इंगोले यांनी केले. यावेळी प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now