maharashtra

डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना आमदार झाले तरी साधेपणा सोडवेना

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सामाजिक कार्यासोबतच आरोग्य सेवेचा वारसा जपला असून त्यांच्या अत्यंत साधेपणामुळे मतदारसंघात ते पुन्हा चर्चेत आले आहेत. आमदार झाल्यानंतर देखील वागण्यात, बोलण्यात नम्र भाव आणि समाजसेवेचा वसा त्यांनी पहिल्याप्रमाणेच जपला असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून आपला हक्काचा माणूस आमदार झाला असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या त्यांच्या कामाची पद्धतीमुळे ते मतदारसंघात पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

2024 विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. या विजयानंतर त्यांनी आपला अत्यंत साधेपणा जपला आहे. आमदार झाल्यानंतर सुद्धा त्यांनी सर्वसामान्य नागरिकांची जोडलेली नाळ तुटू दिली नाही. आजही सर्वसामान्य नागरिक कोणतेही हॉस्पीटल मध्ये असो, आ.बाबासाहेबांना ही गोष्ट समजताच स्वत: ते हॉस्पीटलमध्ये भेटावयास जात असून स्वतः ते रुग्णास तपासतात. रुग्णांस धीर देत नातेवाईकांना सुध्दा सर्व प्रकारची मदत देण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत. नुकतीच त्यांनी एका हॉस्पीटला भेट देत रुग्णांची तपासणी केल्यामुळे हॉस्पीटल मधील उपस्थित रुग्णांचे नातेवाईक, हॉस्पीटलमधील स्टाफ आचंबित झाले होते.

आमदार झाल्यानंतर सुद्धा डॉ.बाबासाहेबांनी आपल्या राहणीत कोणताही बडेजाव केला नाही, त्यांच्या वागण्यात आजही गेल्या तीन वर्षासारखी नम्रता दिसून येत आहे. सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत घरी येणार्‍या प्रत्येकाशी स्वतः संपर्क साधत असून प्रत्येकाच्या अडीअडचणी जाणून घेत असून त्या सोडवण्यासाठी थेट संबंधितांना फोन द्वारे संपर्क साधून प्रत्येकांच्या अडचणी सोडवित आहेत. आ.बाबासाहेब यांना भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला वाट न पाहता थेट संपर्क होत आहे. त्याचप्रमाणे कोणाची शिफारस न घेऊन येता सर्वसामान्यांची साधी कामे सुध्दा मार्गी लागत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महाराष्ट्रातील इतर मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, त्यांचे दौरे, त्यांच्या पाठीमागे असणारा गाड्यांचा ताफा, या गोष्टी दिसतात. पण, आमदार डॉ.बाबासाहेब मात्र गाड्यांच्या ताफ्यात फिरताना दिसत नाहीत. ते एकटेच फिरतात. आजकाल साधेपणा, नि:स्वार्थीवृत्ती हे आता डांगोरा पिटत जगजाहीर करण्याचे गुण झाले आहेत. मात्र ‘शेकाप’चे नवनिर्वाचित तरुण आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे विद्वत्ता, साधेपणा, आणि अस्मिता याचा कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने काम करत आहेत.

 

BUY ONE *व्हेज बर्गर*

GET ONE *Veg Burger*

*FREE!*

🔹🔸◻️

Bakers Gallery,

Erande Complex, Station Road, Sangola.

Mo. 9975355572

 

Related Articles

Back to top button