maharashtrapoliticalsolapurtop news

महायुतीकडून आज कोण कोण मंत्रि‍पदाची शपथ घेणार? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची मंत्र्याची संपूर्ण यादी!

महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) आज (15 डिसेंबर) पार पडणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता हा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मंत्र्यांच्या शपथविधीसाठी राजभवनात तेवढ्या क्षमतेचा सभागृह नाही, त्यामुळे राजभवनाच्या लॉनवर शपथविधीचा कार्यक्रम घेण्यात येईल.

महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांना संबंधित पक्षाचे वरिष्ठांचे फोन जाण्यास सुरुवात झाली आहे. याचदरम्यान आज भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कोण कोण मंत्रि‍पदाची शपथ घेणार, याची संभाव्य यादी समोर आली आहे. (BJP Shivsena NCP Minister List 2024)

भाजपकडून कोण कोण मंत्रि‍पदाची शपथ घेणार?

1) मंगलप्रभात लोढा, मुंबई

2 आशिष शेलार, मुंबई

3 अतुल भातखळकर, मुंबई

4) रविंद्र चव्हाण, कोकण

5) नितेश राणे, कोकण

6) शिवेंद्रसिंहराजे भोसले,पश्चिम महाराष्ट्र

7) गोपीचंद पडळकर,पश्चिम महाराष्ट्र

8) माधुरी मिसाळ,पश्चिम महाराष्ट्र

9) राधाकृष्ण विखे पाटील,पश्चिम महाराष्ट्र

10) चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ

11) संजय कुटे, विदर्भ

12) गिरीश महाजन, उत्तर महाराष्ट्र

13) जयकुमार रावल, उत्तर महाराष्ट्र

14) पंकजा मुंडे, मराठवाडा

15) अतुल सावे, मराठवाडा

शिवसेनेकडून कोण कोण मंत्रि‍पदाची शपथ घेणार?

1) उदय सामंत, कोकण

2) शंभुराजे देसाई, पश्चिम महाराष्ट्र

3) गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र

4) दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र

5) संजय राठोड, विदर्भ

6) संजय शिरसाट, मराठवाडा

7) भरतशेठ गोगावले, रायगड

8) प्रकाश अबिटकर, पश्चिम महाराष्ट्र

9) योगेश कदम, कोकण

10) आशिष जैस्वाल, विदर्भ

11) प्रताप सरनाईक, ठाणे

अजित पवार गटाकडून कोण कोण मंत्रि‍पदाची शपथ घेणार?

1. छगन भुजबळ

2. आदिती तटकरे

3. अनिल पाटील

4. संजय बनसोडे

5. अजित पवार

6. मकरंद पाटील

7. नरहरी झिरवाळ

8. धनंजय मुंडे

राज्यमंत्री-

1. सना मलिक

2. इंद्रनील नाईक

Related Articles

Back to top button