वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश; आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत सांगोल्याचे वर्चस्व
कराटे स्पर्धेत पाच पथकांची कमाई
सांगोला –
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत पहिल्यांदाच कराटे खेळाचा समावेश महाविद्यालयीन स्पर्धामध्ये करण्यात आला. सदर स्पर्धा व्ही. जी.शिवदारे, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सोलापूर येथे झाल्या. या स्पर्धेमध्ये शोतोकोन स्पोर्ट्स कराटे डेव्हलपमेंट असोसिएशन व जेनशिन रियु कराटे डो च्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
सुवर्णपदक आशिष कोकरे रौप्य पदक डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, मयंक स्वामी सांगोला महाविद्यालय, प्रणित गडहिरे डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, कुबेर बनसोडे सांगोला महाविद्यालय, कास्यपदक प्रणिता गडहिरे डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय यांनी यश संपादन केले.
यशस्वी खेळाडूंना श्री.सुनील वाघमारे सरांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंना कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सेक्रेटरी संदीप गाडे, प्रा. विजय पवार सर, प्रा सचिन गायकवाड सर, प्रा संतोष गवळी, प्रा तोरवी सर, प्रा. पाटील सर, कराटे डो असोसिएशन ऑफ सोलापूर चे जी के वाघमारे सर यांनी शुभेच्छा दिल्या.