maharashtrapolitical

मंत्रिमंडळासाठी एकनाथ शिंदेंची टीम तयार, पाहा आज शपथ घेणाऱ्यांची यादी!

महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) आज पार पडणार आहे. दुपारच्या सुमारास नागपुरातील राजभवनात शपथविधी सोहळा होईल. मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष त्यांच्या कोट्यातील काही मंत्रिपद रिक्त ठेवू शकतात अशी शक्यता आहे. दोन्ही पक्षात मंत्री पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे दोन्ही पक्षांकडून काही मंत्रिपद रिक्त ठेवले जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महायुतीच्या मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet Expansion) भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहे. तसेच गृहनिर्माण आणि पर्यटन हे दोन खाती शिवसेनेकडे असणार अशी माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाकडून तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर प्रताप सरनाईक, भरत गोगावले, संजय शिरसाट, योगेश कदम यांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागणार आहे.

कशी असेल टीम एकनाथ शिंदे-

1) उदय सामंत, कोकण

2) शंभुराजे देसाई, पश्चिम महाराष्ट्र

3) गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र

4) दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र

5) संजय राठोड, विदर्भ

टीम शिंदेचं नवे शिलेदार

1) संजय शिरसाट, मराठवाडा

2) भरतशेठ गोगावले, रायगड

3) प्रकाश अबिटकर, पश्चिम महाराष्ट्र

4) योगेश कदम, कोकण

5) आशिष जैस्वाल, विदर्भ

6) प्रताप सरनाईक, ठाणे

कुणा कुणाचा पत्ता कट –

1) दीपक केसरकर

2) तानाजी सावंत

3) अब्दुल सत्तार

Related Articles

Back to top button