दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
14 डिसेंबर 2024 | शनिवार
- मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच नागपूरमध्ये होणार , भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याचे संकेत
- शिवसेनेच्या यादीत अनपेक्षित बदल पाहायला मिळण्याची शक्यता, अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना नारळ दिला जाण्याची चिन्हं
- दादरच्या हनुमान मंदिराबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, किरीट सोमय्या मंदिरात गेल्यानंतर शिवसैनिक आक्रमक
- आम्ही उद्धव ठाकरेची सेना नाही, ज्याने बापाचं नाव बुडवलं, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून किरीट सोमय्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
- बीडच्या वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल असून तो खुला फिरतोय, सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अजितदादांनी धनंजय मुंडेंना मंत्री करु नये, बीड हत्याप्रकरणावरुन संभाजीराजे संतापले
- उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी, विदर्भातही बोचरी थंडी, गोंदियात आज 6.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद
- पूर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज
- मोदी म्हणाले – काँंग्रेस संविधानाची शिकार करत राहिली: संविधान दुरुस्तीचे रक्त काँग्रेसच्या तोंडाला लागले, 6 दशकात 75 वेळा बदल केले
- राहुल म्हणाले- द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला: तसे, सरकार तरुण-शेतकऱ्यांचे अंगठे कापतेय; अनुराग ठाकुरांचे उत्तर- तुमच्या सरकारमध्ये शिखांचे गळे कापले गेले
- महायुतीत मलाईदार खात्यांसाठी भांडण: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप; पराभवाची जबाबदारी एकाची नव्हे तर सर्वांची असल्याचा दावा
- जालन्यात बस – ट्रकचा भीषण अपघात: 2 ठार, 18 – 20 जण जखमी झाल्याची माहिती; जालना- मेहकर मार्गावरील नाव्हा लगतची घटना
- ट्रम्प 18 हजार भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढणार: अवैध स्थलांतरित, यांच्याकडे कागदपत्रे नाहीत; अमेरिकेने भारताला मदत न करणारा देश म्हटले
- शेतकरी 16 डिसेंबरला ट्रॅक्टर मार्च काढणार: दिल्लीला जाणाऱ्या गटावर अश्रुधुराचा मारा, शेतकरी जखमी झाल्यावर मागे बोलावले
- इंदिरा गांधी संविधान विरोधी होत्या का?: श्रीकांत शिंदे यांचा संसदेत सवाल; राहुल म्हणाले – सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली!
- भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी: पहिल्या दिवसाचा खेळ पावसात वाहून गेला : दोन सत्रात एकही चेंडू टाकला गेला नाही; AUS- 28/0
- मोहम्मद आमिरने पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली: T20 विश्वचषकातून निवृत्तीनंतर परतले होते; इमाद वसीमनेही घेतली निवृत्ती
- बांगलादेशी क्रिकेटर शकिब अल हसनच्या गोलंदाजीवर बंदी: ईसीबीने बंदी घातली, फील्ड अंपायरने गोलंदाजी अॅक्शन बेकायदेशीर ठरवली
Menu
Solapurviralnews
Search for
Home/maharashtra
maharashtrapoliticalsolapurtop news
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर
12 डिसेंबर 2024 | गुरुवार
Photo of मुख्यसंपादक – सुनील मस्के मुख्यसंपादक – सुनील मस्के Send an email2 days ago 14,786 1 minute read
अमित शहांनी घेतली शरद पवारांची भेट: भाजप नेते म्हणाले – पवार महायुतीत आले तर आनंदच; दिल्लीसह राज्याचे राजकारण तापले
18 वर्षीय गुकेश बुद्धिबळाचा नवा विश्वविजेता: सर्वात कमी वयात विजेतेपद पटकावले, 14व्या गेममध्ये चिनी खेळाडूचा पराभव केला
अजित पवारांनी दिल्लीत सहकुटुंब भेटून शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रफुल्ल पटेलांसह छगन भुजबळ आणि सुनील तटकरेही उपस्थित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, महाराष्ट्रासाठी पूर्ण सहकार्य करण्याचं पंतप्रधानांचं आश्वासन, फडणवीसांची माहिती
भाजप स्वतःवरच अन्याय करुन घेईल पण मित्रांवर अन्याय करणार नाही, मंत्रीमंडळ विस्तारावरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेतील 16 लाख अर्जांची छाननी होणार, पात्र अपात्र ठरवून लाभ दिला जाणार
भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी
गडकरी म्हणाले- परदेशातील मीटिंगमध्ये तोंड लपवण्याचा प्रयत्न करतो: देशातील रस्ते अपघात कमी करण्याचे लक्ष्य होते, त्यात आणखी वाढ झाली
मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला, पण NCP ची अडचण: दादांचा प्लॅन B तयार; केंद्रात मंत्रिपद, छोट्या राज्याचे राज्यपालपद मागितल्याचा दावा
भाजप सांगेल, ते नाईलाजाने मान्य करावे लागेल: सत्ता सोडून स्वाभिमान दाखवण्याचे कुणाचे धाडस नाही, जयंत पाटलांचा शिंदे – अजितदादांना टोला
दावा- एक देश-एक निवडणूक विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी: पुढील आठवड्यात संसदेत आणणार, मंजूर झाल्यास 2029पर्यंत देशभरात एकाच वेळी निवडणुका होतील
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकत्र येणार?: संजय शिरसाट म्हणाले – आम्हाला वाटून काय उपयोग? टाळी दोन्ही हातांनी वाजण्याची गरज
दिल्ली सरकार महिलांना दरमहा 1000 रुपये देणार: महिला सन्मान योजना आजपासून लागू; केजरीवालांची घोषणा- निवडणुकीनंतर 2100 रुपये देणार
गोपीनाथ गडावर अभिवादनासाठी मोठी गर्दी: पंकजा मुंडे म्हणाल्या- साहेबांचे संस्कार व विचार संपू देणार नाही, बीडमधील गुन्हेगारीवर चिंता
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी-पोलिसांची मिलीभगत: अंबादास दानवे म्हणाले – PI सह धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कराडला आरोपी करा
SA20 लीगमधील इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमाविरुद्ध जॅक कॅलिस: म्हणाला- यामुळे अष्टपैलूंची संधी कमी होते; लीग 9 जानेवारीपासून सुरू होणार
🔹🔹🔹
सौजन्य –
✨ *हॉटेल जयनिला* ✨
चविष्ट व उत्तम शाकाहारी व मांसाहारी …. जेवण मिळवण्याचे एकमेव ठिकाण…
🔸♦️🔸♦️
सोलापूर कोल्हापूर हायवे, सांगोला बायपास राऊत मळा, सांगोला – 413307
मो.8007812004