maharashtra

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर

06 डिसेंबर 2024 | शुक्रवार

  1. खातेवाटपाची चर्चा जवळजवळ संपत आलीय, हिवाळी अधिवेशनाअगोदर मंत्रिमंडळ विस्तार, गृहखात्याबाबत निर्णय होईल तेव्हा सांगेन, देवेंद्र फडणवीसांची माहिती
  2. संसदेत सिंघवी यांच्या सीटखाली 50 हजार रोख सापडली: सभापती धनखड यांनी सांगितल्यावर खरगे म्हणाले- नाव घेणे ठीक नाही, भाजपने म्हटले- चौकशी व्हावी
  3. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन: वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सलग 7 वेळा राहिले आमदार
  4. मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा मैदानात: फडणवीस सरकारला 5 जानेवारीपर्यंतचा अल्टीमेटम; ‘मस्ती अन् गुर्मीत राहू नका’ असा इशारा
  5. संजय राऊतांना आवरलं नाही तर उद्धव ठाकरेंच्या आमदारांचं काही खरं नाही, त्या आमदारांनी राऊतांपासून सावध राहावं,शंभूराज देसाईंचा इशारा
  6. राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षांच्या मदतीबाबत प्रश्न अन् भाजपच्या भूमिकेवर नाराजी,अजित पवारांसमोर उमेदवारांनी अडचणी मांडल्या, पुढील निवडणुकीच्या कामाला लागा, पूर्ण ताकद देणार, दादांची ग्वाही
  7. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती होणार,नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार, नियमानुसार काम करणार अशी कोळंबकरांची भूमिका
  8. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सलग 11 व्यांदा रेपो रेट जैसे थे,वाहन खरेदी कर्ज घेणाऱ्यांसह गृह कर्जदारांची यावेळीही निराशा; रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कृषी कर्जाची मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत वाढवली, कोणत्याही हमीशिवाय शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज
  9. राज्यावर अवकाळी पावसाचं संकट; छत्रपती संभाजीनगर, लातूर, सिंधुदुर्ग, नाशिकमध्ये पावसाची हजेरी, पिकांच्या नुकसानामुळं शेतकरी चिंतेत
  10. एकनाथ शिंदे मंत्रिपद देताना कठोर होणार: दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांच्याजागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता
  11. मी बेस्ट CM साठी नव्हे लोकांची कामे करण्यासाठी आलो: फडणवीस यांचा शिंदेंना टोला? मागील 10 वर्षांत अधिक प्रगल्भ झाल्याची भावना
  12. कालच्या शपथविधीत एकनाथ शिंदे दुर्लक्षित: BJP च्या इतिहासाचा दाखला देत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला दावा
  13. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेना पेजला केले फॉलो: दबावतंत्र की अनावधानाने घडलेली कृती?, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  14. BJP शिंदेंशिवाय शपथविधी उरकणार होती?: संजय राऊतांचा दावा; मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न झाला, पण आमचे ठरले होते -शिरसाट
  15. ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांना डिवचले: अंबादास दानवे यांनी पोस्ट केला शिंदेंचा अमित शहा, देवेंद्र फडणवीसांपुढे खांदे झुकलेला फोटो
  16. आम्ही विरोधी पक्षात असलो तरी मॅन्डेट पूर्ण मानत नाही: देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना 3000 रुपये द्यावे – सुप्रिया सुळे
  17. ओपनिंग डेला पुष्पा-2 ने जवानचा विक्रम मोडला: सर्वात मोठा ओपनिंग करणारा भारतीय चित्रपट ठरला, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येही विक्रम
  18. U-19 आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचला भारत: श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव; वैभव सूर्यवंशीने केल्या 67 धावा, 5 षटकारही ठोकले
  19. डे-नाईट कसोटीचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावे: लॅबुशेन-मॅकस्विनी नाबाद परतले; भारत 180 धावांवर ऑलआऊट

 

सौजन्य –

हॉटेल जयनिला,सांगोला
मो.8007812004

Related Articles

Back to top button