maharashtra

शिवसेनेचे नेते सागर पाटील यांच्या गाडीवर हल्ला

शेकाप नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्याकडून निषेध

 

सांगोला:- शिवसेनेचे नेते सागर पाटील यांच्या गाडीवर हल्ला झालेली घटना निषेधार्थ असून घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांचेकडे शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी केली.

शिवसेनेचे नेते सागर पाटील यांच्या गाडीवर हल्ला झाला असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे समजल्यानंतर डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी याबाबत माहिती घेतली असता पोलीस स्टेशनला याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही असे सांगण्यात आले असून घटनेचे सखोल चौकशी करण्याची मागणी शेकापचे नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी केली आहे.

सांगोला तालुक्यामध्ये स्व. आबासाहेबांनी ज्या पद्धतीने सुसंस्कृत राजकारण व समाजकारण केले होते त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात सुद्धा त्याच पद्धतीचे कामकाज करण्यात येणार असून गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा देण्यात येणार नाही. त्यामुळे अशा हल्ल्यांना शेतकरी कामगार पक्ष कदापिही पाठीशी घालणार नसून या घटनेचा मी व्यक्तीशा निषेध करत असून घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी डॉ. अनिकेत देशमुख यांनी पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांचेकडे केली आहे.

सौजन्य

सदानंद मल्टीपर्पज हॉल, सांगोला 

मो. 7709214995

Related Articles

Back to top button