सांगोला(प्रतिनिधी):-येथील सांगोला महाविद्यालयामध्ये येत्या शनिवार व रविवार दि.5 व 6 एप्रिल 2025 रोजी एकविसाव्या महाराष्ट्र सिंचन परिषेदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील याचे शुभहस्ते होणार आहे. यावेळी जलसंपदा सचिव डॉ.संजय बेलसरे, कार्यकारी संचालक अतुलजी कपोले, सरपंच पोपटराव पवार उपस्थीत राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष, डॉ.दि.मा.मोरे, या परिषदेचे स्वागताध्यक्ष तथा सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र सिंचन सहयोग या संस्थेच्या वतीने पाणी आणि सिंचन या प्रश्नावर शेतकर्यांमध्ये जनजागृती केली जाते. या संस्थेने यापूर्वी राज्यातील ग्रामीण भागात शेतकर्यांसाठी वीस पाणी परिषदा घेऊन हजारो तज्ज्ञ मार्गदर्शकांना व जलचिंतकांना एका मंचावर आणले. यावर्षी एकविसावी महाराष्ट्र सिंचन परिषेद सांगोला येथे सांगोला महाविद्यालयामध्ये होत आहे. हवामानातील दोलाईमानता आणि सिंचन व्यवस्थापन हा या परिषदेचा मुख्य विषय आहे, त्याचबरोबर आधुनिक सिंचन प्रणाली, सिंचनाच्या भावी दिशा, सिंचित शेतीतील प्रयोग, फळबाग शेती या विषयावर मार्गदर्शन व प्रयोगशील शेतकर्यांचे अनुभव या परिषदेमध्ये शेतकर्यांना ऐकायला मिळणार आहेत.












