top news
महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघितले तर याद राखा, हा इशारा नाही धमकी देत आहोत
कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील ४० गावांना आपल्या राज्यात नेण्यासाठी प्रयत्न करत आहे. गुजरातचा मुख्यमंत्री राज्यातील उद्योग पळवून नेतो आणि तुम्ही षंढासारखे गप्प बसला. मी सीमा भागात गेलो आहे, आताही जाणार आहे. मी XX नाही, शिवसेना XXX ची अवलाद नाही. मी परत सांगतो.
मुख्यमंत्र्यांकडे सीमाभागाचा भार होता तर १० वर्षामध्ये का गेला नाही? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. महाराष्ट्राचे सरकार दुबळे असेल, पण आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना राज्यावर आलेले प्रत्येक संकट परतावून लावेल.
रक्त सांडवण्याची वेळ आली तर तेही करू.१०६ हुतात्मे दिले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी तुरुंगवास भोगला आहे, आम्हीही भोगू. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघितले तर याद राखा, हा इशारा नाही धमकी देत आहोत, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.