maharashtra
तुम्ही बेळगाव, कारवार, निपाणी सोडत असाल तर…
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे. त्यामुळे कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोम्मई यांना प्रत्युत्तर दिले आहे.
तुम्ही बेळगाव, कारवार आणि निपाणी सोडत असाल तरच पुढची चर्चा होऊ शकते, असे पवार यांनी सांगितले. आज मुंबईत पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी गेली अनेक वर्ष लढा सुरु आहे.
मी काल बोम्मईंचे जतबाबत विधान ऐकले. जर तिकडच सरकार बेळगाव, कारवार, निपाणी हा सगळा परिसर आपल्याला सोडायला तयार असतील तर त्यांना काय काय देता येईल, यावर चर्चा करणे शक्य होईल, असे म्हणत सीमाप्रश्नावर पवारांनी भाष्य केले आहे.