टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अखेर मुंबईने हार्दिकला सोडलं, पंजाबचा मोहरा अर्शदीप सिंग पलटनच्या हाती, किती कोटींची डील?

On: November 11, 2026 10:58 AM
Follow Us:

Mumbai Indians And PBKS IPL Trade: आयपीएल २०२७ पूर्वी सर्वात मोठा ट्रेड पार पडला आहे, मुंबई इंड़ियन्स आणि पंजाब किंग्जमध्ये हा ट्रेड झाला आहे.

अखेर मुंबईने हार्दिकला सोडलं, पंजाबचा मोहरा अर्शदीप सिंग पलटनच्या हाती, किती कोटींची डील?

Hardik Pandya And Arshdeep Singh IPL Trade: हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांच्यातील ट्रेडला दुजोरा मिळाला आहे. आयपीएलने बुधवारी (११ नोव्हेंबर) या ट्रेडबाबत अधिकृत माहिती दिली. हार्दिक पांड्या आयपीएल २०२७ मध्ये पंजाब किंग्सकडून खेळेल, तर अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये दिसेल. हार्दिक एमआयचा कर्णधार होता. दुसरीकडे, अर्शदीप बऱ्याच काळापासून पंजाब संघाचा भाग होता. मात्र, या दोघांच्या ट्रेडच्या बातम्या बऱ्याच काळापासून पसरत होत्या.

या ट्रेडमध्ये हार्दिकला त्याच्या सध्याच्या मानधनापेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. अर्शदीप त्याच्या सध्याच्या मानधनावर मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. हार्दिक १८ कोटी रुपयांच्या मानधनावर पंजाब किंग्समध्ये सामील झाला होता, तर मागील हंगामात, म्हणजेच आयपीएल २०२६ मध्ये, तो १६.५ कोटी मानधनावर पंजाबमध्ये होता. अर्शदीप १८ कोटी मानधनावर मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला.

 

 

“आयपीएल २०२७ च्या आधी होणाऱ्या एका मोठ्या खेळाडूंच्या ट्रेडमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये जाईल, तर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज अर्शदीप सिंग, पाच वेळच्या विजेत्या संघात सामील होईल,” असे आयपीएलच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 

मुंबई इंडियन्सने धन्यवाद हार्दिक अशी पोस्टही शेअर केली आहे. एक व्हिडिओही हार्दिकसाठी शेअर केला आहे. तर अर्शदीप सिंगच्या स्वागतासाठी एक पोस्टही मुंबईने शेअर केली आहे. बऱ्याच दिवसांपासून याची चर्चा रंगली होती, आता अखेर तो दिवस आलाच जेव्हा अधिकृत घोषणा केली आहे. काल विमल कुमार या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर अर्शदीप सिंगच्या वडिलांनी हे कन्फर्म केलं होतं. अधीच चर्चा सुरु होत्या त्यात अर्शदीपच्या वडिलांनी ही बातमी कन्फर्म केल्यानंतर मुंबईनेही अधिकृत पोस्ट करत आज माहिती दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल

Rajendra Pawar Ajit Pawar: “काय बंधू?” अजित दादांची ती हाक अन् बालपणीच्या आठवणी; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार भावूक, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत केलं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले….

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर तीच खरी दिवाळी, शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचं सूचक वक्तव्य

Eknath Shinde Shivsena : आमचा हक्क पाहिजे, नाहीतर..महायुतीत शिंदे शिवसेनेची आक्रमक भूमिका, भाजपवर राग

Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले