टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल

On: November 11, 2026 10:51 AM
Follow Us:

Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: चंद्रकांतदादांनी सतेज पाटलांची प्रॉपर्टी काढली, रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘तुम्ही हॉटेलबाहेर चहासाठी उभे असायचात’

Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: गोकुळच्या अध्यक्षपदावरुन कोल्हापूरमधील नेत्यांमध्ये सध्या जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत गोकुळच्या अध्यक्षपदी (Gokul Chairman Election 2026) महायुतीच्या राजेश पाटील यांची निवड झाल्यानंतर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज उर्फ बंटी पाटील (Satel Patil) यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. बंटी पाटील तू बंटीच राहिलास, तू कधी बंटी साहेब झालाच नाहीस. तुमच्या प्रॉपर्टीत इतकी वाढ कशी झाली? बंटी पाटलांना त्यांच्या कुटुंबात सर्वात श्रीमंत व्हायचे आहे. एकेकाळी त्यांचे वडील डी.वाय.पाटील कोल्हापूरमध्ये स्कुटरवरुन फिरायचे. मग आता बंटी पाटलांकडे इतकी संपत्ती कुठून आली? मलई खाण्यासाठीच त्यांना गोकुळची सत्ता हातात हवी आहे, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली होती. यावरुन शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना खोचक टोला लगावला आहे.  (Maharashtra Politics news)

सतेज पाटील यांचे वडील डी. वाय. पाटील स्कुटरवर फिरायचे, ते ठीक आहे. पण महाराष्ट्राने तुमची परिस्थितीही बघितली आहे. तुम्ही शबनम झोळी घेऊन हॉटेलच्या बाहेर  वाट पाहत बसायचात. कोणीतरी हॉटेलच्या आत नेऊन चहा पाजतंय का, यासाठी तुम्ही वाट बघायचात. तुमची परिस्थितीही या महाराष्ट्राने बघितली आहे ना. तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का?, असा खोचक सवाल रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला.

मी चंद्रकांत दादांचं भाषण ऐकलं, हे सगळं नळावरच्या भांडणासारखं चाललंय. मी ह्याव करेन, त्याव करेन. काय चाललंय, तुम्ही दमदाटी करताय. हे किती दिवस आहे, तुमची सत्ता पण जाणार आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे. सत्ता ही कोणाची मांडलिक नाही, कोणाच्या दारात थांबत नाही , आज इथे उद्या तिकडे असते. कधीतरी लोक चौकाचौकात मनगट धरणार आहेत तुमचं, तेव्हा तुम्हाला उत्तर देताना नाकीनऊ येईल. केसं एका बाजूला राहील, धोतर एका बाजूला राहील, चष्मा एका बाजूला राहील, तो काळ फार लांब नाही जवळचा आहे. दमदाटी केली नाही पाहिजे, ही लोकशाही आहे, हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आहे, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

अखेर मुंबईने हार्दिकला सोडलं, पंजाबचा मोहरा अर्शदीप सिंग पलटनच्या हाती, किती कोटींची डील?

Rajendra Pawar Ajit Pawar: “काय बंधू?” अजित दादांची ती हाक अन् बालपणीच्या आठवणी; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार भावूक, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत केलं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले….

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर तीच खरी दिवाळी, शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचं सूचक वक्तव्य

Eknath Shinde Shivsena : आमचा हक्क पाहिजे, नाहीतर..महायुतीत शिंदे शिवसेनेची आक्रमक भूमिका, भाजपवर राग

Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले