टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

फेक इन्स्टाग्राम अकाउंटचा सापळा; लोहगडावर नेऊन केतनची हत्या?

On: September 29, 2026 6:32 PM
Follow Us:

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, केतनला लोहगडावर नेण्यासाठी आरोपींनी ‘माही’ नावाचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले होते. या अकाउंटवरून केतनशी संवाद साधून त्याला सिया हिच्या वाढदिवसाच्या सरप्राइजसाठी लोहगडावर येण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

१८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतनचा मृत्यू झाला. पोलिसांच्या तपासानुसार, त्याला कड्यावरून ढकलण्यात आल्याचा आरोप सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांच्यावर आहे. या प्रकरणात तिघांवरही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी आरोपींचे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करून डिलीट केलेल्या चॅट्सचा शोध घेतला. तांत्रिक तपासात बनावट इन्स्टाग्राम अकाउंट आणि त्यावरील संभाषण पोलिसांना मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. या डिजिटल पुराव्यांचा तपासात महत्त्वाचा आधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात ५,०५३ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान, केतनच्या वडिलांनी मुलाचे सिया सोबत लग्न ठरले होते आणि दोन्ही कुटुंबे लग्नाची तयारी करत होती, अशी माहिती दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

पुण्यात २३ वर्षीय IT इंजिनियर विवाहितेचा मृत्यू; पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

पूजेदरम्यान वाद अन् गोळीबार; आझमगडमध्ये पत्नी, मुलगा आणि दोन पुरोहितांचा मृत्यू

चॅटजीपीटीपासून क्राइम सिनेमांपर्यंत; केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील 5,053 पानी आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे

साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे यांचे सवाल; ‘विद्यार्थ्यांनी जात-धर्माच्या राजकारणात अडकू नये’

Nasrapur Case: नसरापूरच्या नराधमाला फाशीच!, चिमुकलीवर अत्याचार करुन संपवणाऱ्या भीमराव कांबळेला शिक्षा, पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय

Nagpur Accident News: थरारक ! रस्त्यांवर रेसिंगच्या नादात भरधाव कार थेट पोहेवाला शॉपमध्ये घुसली