टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

पुण्यात २३ वर्षीय IT इंजिनियर विवाहितेचा मृत्यू; पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

On: September 27, 2026 11:27 PM
Follow Us:

पुण्यातील उंड्री-वडाचीवाडी परिसरात २३ वर्षीय विवाहित IT इंजिनियर वैष्णवी प्रविण जरांडे यांचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी त्यांच्या पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैष्णवी यांचा विवाह ९ मे २०२६ रोजी ओंकार संजय घिसरे यांच्याशी झाला होता. विवाहावेळी माहेरच्या कुटुंबीयांनी सुमारे ४५ लाख रुपये खर्च करून १० तोळे सोने दिल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर चारचाकी वाहन घेण्यासाठी आणखी ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विवाहानंतर काही काळ पुण्यात राहिल्यानंतर वैष्णवी नोकरीनिमित्त बंगळुरूला गेल्या होत्या. जूनच्या अखेरीस त्या पुन्हा पुण्यात सासरी आल्या होत्या आणि घरूनच IT कंपनीचे काम करत होत्या. याच काळात पती व सासू-सासऱ्यांकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

२४ सप्टेंबरच्या रात्री वैष्णवी यांनी आईशी फोनवर संपर्क साधून सासरी होत असलेल्या त्रासाबाबत सांगितल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्याच रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्या पतीने माहेरच्या कुटुंबीयांशी फोनवर संपर्क साधल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर वैष्णवींशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांचे आई-वडील पुण्यात आले आणि त्यांना घटनेची माहिती मिळाली.

वैष्णवी यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती ओंकार संजय घिसरे यांच्यासह सासू-सासऱ्यांविरोधात हुंडा प्रतिबंधक कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास काळेपडळ पोलीस करत असून, तपासानंतर आरोपांबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

पूजेदरम्यान वाद अन् गोळीबार; आझमगडमध्ये पत्नी, मुलगा आणि दोन पुरोहितांचा मृत्यू

चॅटजीपीटीपासून क्राइम सिनेमांपर्यंत; केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील 5,053 पानी आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे

साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे यांचे सवाल; ‘विद्यार्थ्यांनी जात-धर्माच्या राजकारणात अडकू नये’

Nasrapur Case: नसरापूरच्या नराधमाला फाशीच!, चिमुकलीवर अत्याचार करुन संपवणाऱ्या भीमराव कांबळेला शिक्षा, पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय

Nagpur Accident News: थरारक ! रस्त्यांवर रेसिंगच्या नादात भरधाव कार थेट पोहेवाला शॉपमध्ये घुसली

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा