टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

जुनोनी येथे भीषण अपघात; माय-लेकरांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

On: May 25, 2026 8:44 PM
Follow Us:

सांगोला (प्रतिनिधी):- भरधाव वेगाने असलेल्या पुढील कारचे टायर फुटल्याने व पाठीमागून येणार्‍या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकून पलटी झाल्याने या अपघातात कारमधील दोघा माय लेकरांचा गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर कुटुंबातील अन्य 6 महिला, पुरुष व लहान मुले गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दि.25 मे रोजी दु.12 वाजणेच्या सुमारास सांगोला मिरज रोडवरील जुनोनी ता.सांगोला येथे घडली आहे.

संदिप भोसले वय 32 व रेखा भोसले वय 60 दोघेही रा.पलूस एमआयडीसी पलूस जि.सांगली अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. तर वेदांत भोसले वय 10, वैभव भोसले वय 12, दुर्वा भोसले वय 5, विद्या भोसले वय 36, ज्योती भोसले वय 30 हे गंभीर जखमी तर अनिल भोसले वय 36 हे किरकोळ जखमी झाले आहेत.

पलूस जि.सांगली येथील भोसले कुटूंबीय सध्या अधिक महिना सुरू असल्याने देवदर्शनासाठी मिरज सांगोला रोडवरून मारुती सुझुकी कारमधून पंढरपूर येथे निघाले होते, दरम्यान त्यांची कार जुनोनी ता.सांगोला जवळील बायपास जवळ आली असता त्यांच्या कार च्या पुढे असणार्‍या कारचे टायर फुटला व दुसर्‍या लेनवरील भोसले यांच्या ताब्यातील असलेल्या कारचे नियंत्रण सुटल्याने मारुती सुझुकी कार डिव्हायडरला धडकून दोन, तीन पलटी मारल्याने कारमधील संदीप भोसले व रेखा भोसले या माय लेकरांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर वेदांत भोसले, वैभव भोसले, दुर्वा भोसले, विद्या भोसले, ज्योती भोसले हे गंभीर जखमी तर अनिल भोसले हे किरकोळ जखमी झाले असल्याची घटना घडली आहे, याबाबत सांगोला पोलिसांत नोंद झाली नव्हती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा