सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी पदार्थांचा समावेश करावा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हेल्दी व्हेजिटेबल सँडविच बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हे सँडविच खाल्ल्यानंतर पोट भरलेले राहील.

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? असा प्रश्न सर्वच महिलांना कायम पडतो. नाश्त्यात लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं काहींना काही चविष्ट पदार्थ खाण्यास हवे असतात. नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा पोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण नेहमीच तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हेल्दी टेस्टी व्हेजिटेबल सॅंडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सँडविच खायला खूप जास्त आवडते. पण बऱ्याचदा लहान मुलांसह मोठेसुद्धा भाज्या खाण्यास नकार देतात. त्यामुळे मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या खाण्यास द्यावेत. भाज्या खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. सँडविच तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी नाश्त्यात खाण्यासाठी बनवू शकता. यामुळे पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया हेल्दी व्हेजिटेबल सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
- ब्रेड
- काकडी
- टोमॅटो
- कांदा
- बीट
- शिमला मिरची
- हिरवी चटणी
- काळीमिरी पावडर
- चाट मसाला
- बटर
- चीज
कृती:
- हेल्दी व्हेजिटेबल सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. यामुळे सँडविचची चव सुंदर लागेल.
- मोठ्या वाटीमध्ये चिरून घेतलेल्या भाज्या घेऊन त्यात हिरवी चटणी घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि काळीमिरी पावडर घालून मिक्स करा.
- तुमच्याकडे चिंच गुळाची चटणी उपलब्ध असल्यास ती सुद्धा मिक्स करू शकता. यामुळे पदार्थाला सुंदर चव येईल.
- ब्रेडच्या स्लाइसवर सॉस लावून त्यावर भाज्यांचे तयार केलेले मिश्रण घालून वरून दुसरा ब्रेड स्लाइस ठेवा.
- तवा गरम करून त्यावर बटर टाका आणि तयार केलेले सँडविच दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. यामुळे पदार्थाची चव चांगली लागेल.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हेल्दी व्हेजिटेबल सँडविच.
कूलरमधून येतोय प्रचंड दुर्गंधी वास? करा हे घरगुती उपाय, परत कधीच येणार नाही वास, मिळेल थंड फ्रेश हवा

















