टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

शहाजीबापू यांचा योग्य तो सन्मान करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

On: April 24, 2026 9:46 AM
Follow Us:

सांगोला व पंढरपूर येथील शिंदे सेनेच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

सांगोला -शहाजीबापू हे माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांचा योग्य तो सन्मान करायचा मी ठरवले असून , तुम्ही सर्वजण निश्चिंत रहा असा शब्द शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोल्यातील शिष्टमंडळाला दिल्याने शहाजी बापूंच्या विधान परिषदेसाठी अशा बळावल्या आहेत.

महाराष्ट्रातून विधान परिषदेच्या 9 जागा निवडून द्यायच्या आहेत त्यासाठी आज गुरुवार 23 एप्रिल पासून नामनिर्देशन पत्र दाखल होणार आहे या अनुषंगाने माढा, सांगोला व पंढरपूर येथील शिंदे सेनेच्या शिष्टमंडळाने काल बुधवारी मुंबई येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन ’ शासकीय निवासस्थानी भेट घेऊन माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगोला नगरपालिका व नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेने शिवसेनेला अपेक्षित असे यश मिळवून दिल्याबद्दल जनतेचे आणि नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीसह पदाधिकारी कार्यकर्त्याचे कौतुक केले तसेच सर्वांची आपुलकीने चौकशी विचारपूस करून चहापान केले.

या शिष्टमंडळात नगराध्यक्ष आनंदा माने, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे, चरणराज चौरे , योगेश खटकाळे , सागर पाटील, नगरसेवक प्रशांत धनवजीर, माऊली तेली, अरुण पाटील, काशिलिंग गावडे, चैतन्य राऊत, उद्योजक बाळासाहेब आसबे, अनिल सावंत, संजय कोकाटे ,साईनाथ अभंगराव, सीपी बागल, संतोष सुळ, महादेव शिंदे, सचिन काळे , समाधान सरगर आदी मान्यवरांचा समावेश होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगोल्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते त्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी टायगर अभी जिंदा है.. अशी शहाजी बापूंची स्तुती करताना मी त्यांना वार्‍यावर सोडणार नसल्याचा शब्द दिला होता. त्यामुळे सांगोल्यातील शहाजी बापू प्रेमी सह जनतेचे लक्ष्य एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा