उपांत्य फेरीपूर्वी ऑस्ट्रेलिया संघात नव्या खेळाडूला एन्ट्री, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे. हा सामना ४ मार्च रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडणार आहे. अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी दोन्ही संघ जोर लावणार यात काही शंका नाही. पण या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघात अष्टपैलू खेळाडूची भर पडली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. मंगळवारी (४ मार्च) भारत आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीच्या सामन्यात आमनेसामने येतील. पण या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात एक बदल केला आहे.

1 / 5
ऑस्ट्रेलियाने २१ वर्षीय युवा अष्टपैलू खेळाडू कूपर कॉनोलीला दुबईला बोलावले आहे. कूपरने यापूर्वी ऑस्ट्रेलियासाठी ६ सामने खेळले आहेत. आता, उपांत्य फेरीच्या आधी त्याची संघात निवड करण्यात आली आहे.

2 / 5
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू शॉर्ट उपांत्य फेरीतून बाहेर पडला आहे. शुक्रवारी लाहोरमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना शॉर्टला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे.

3 / 5
मॅथ्यू शॉर्टच्या जागी आता संघात कूपर कॉनोलीची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार, कॉनोली दुबईमध्ये ऑस्ट्रेलियन संघात सामील होईल. ४ मार्च रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीत कूपर कॉनोली खेळेल की नाही हे प्लेइंग ११ जाहीर झाल्यावरच स्पष्ट होणार आहे.

4 / 5
ऑस्ट्रेलिया संघ: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगिर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघ, अॅडम झांपा, शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅलेक्स केरी, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, कूपर कॉनोली.

Pune Crime: पोलिसांवर कोयत्याने हल्ला, 2 गोळ्या झाडल्या आणि…

Jitendra Awhad : …म्हणून जितेंद्र आव्हाड आज गुन्हेगारांना घालतात तशा हातात बेड्या घालून आले विधान भवनात

लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची ‘गुड न्यूज’

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon