Pune Crime: पोलिसांवर कोयत्याने हल्ला, 2 गोळ्या झाडल्या आणि…

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Pune Crime: पुणे विद्येचे माहेरघर की गुन्हेगारांचं शहर…? स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर, दरोडेखोरांनी पोलिसांवर केला हल्ला, कोयत्याने हल्ला, झाडल्या 2 गोळ्या आणि…, घडणाऱ्या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण

Pune Crime: पुणे येथील स्वारगेट बस स्टँडवरील बलात्कार प्रकरण ताजं असताना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांवर हल्ला झाला आहे. दोन दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. पोलीस आणि दरोडेखोर आमनेसामने आल्यानंतर दरोडेखोरांनी पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला आहे. पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक यांच्यावर दरोडेखोरांनी कोयत्याने हल्ला केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोन्ही पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी दरोडेखोरांवर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी दरोडेखोराच्या पायाला लागली असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यातल्या केंदूर घाटातली मध्यरात्री घडलेली ही घटना आहे.

पुण्यात सतत होणाऱ्या धक्कादायक घटना पाहता पुणे विद्येचं माहेरघर की गुन्हेगारांचं शहर…? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे येथील स्वारगेट बस स्टँडवरील बलात्कार घटनेनंतर देखली शहर हदरलं आहे.

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon