Jitendra Awhad : “गांधी हत्या नथुरामने केली पण विचार कोणाचे होते? हा प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी विचारलेला. वाल्मिक कराडवर हत्येचा आरोप सिद्ध झालाय. आम्ही ओरडून सांगत होतो. सरकार ऐकायला तयार नव्हतं. सीआयडीने आता समोर आणलय”
महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आज हातात बेड्या घालून अधिवेशनाला पोहोचले. मीडियाशी बोलताना त्यांनी आपण या बेड्या का घातल्या? त्यामागच स्पष्टीकरण दिलं. “महाराष्ट्रात, भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य चिरडलं जातय त्यासाठी हातात बेड्या घातल्या” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो घाला घातला जातोय. ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांचे आवाज बंद केले जात आहेत, ती पद्धत चिुकीची आहे. व्यक्त होणं आमचा संवैधानिक अधिकार आहे. आम्हाला व्यक्त होता आलच पाहिजे. आमचे मूलभूत अधिकार शाबूत राहिले पाहिजेत म्हणून या बेडया आहेत” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“अमेरिकेत भारतीयांवर अन्याय होतोय. ट्रम्प यांनी व्हिसाचं आखलेलं धोरण अनेक घर-संसार उद्धवस्त करणारं आहे. ज्या प्रकारे भारतीयांना एक-दोन विमानात कोंबून भारतात पाठवलं जातय. पायात साखळदंड, हातात हतकड्या, शौचालयास जागा नाही. उपाशी ठेवणं हा भारतीयांचा अपमान करण्याचा प्रकार होता. महाराष्ट्रातले अनेक जण या पेचात अडकले आहेत. पोरं अमेरिकेत तर आई-बाप महाराष्ट्रात आणि आई-बाप अमेरिकेत तर पोरं महाराष्ट्रात राहणार. अमेरिकेत जाऊन मोठ होण्याची स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसाची स्वप्न उद्धवस्त होताना दिसतायत. जर आपण अमेरिकेच्या अन्यायाविरोधात व्यक्त होणार नसू तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल. अमेरिकेत आपले बांधव काय यातना भोगतायत त्यासाठी या बेड्या हातात घातल्या आहेत” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘गांधी हत्या नथुरामने केली पण विचार कोणाचे होते?’
“आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नका. अमेरिकेविरुद्ध आवाज उठवायला शिका. अमेरिका आपली बाप नाही” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. याच बेड्या धनंजय मुंडेंना घातल्या जाव्यात का? त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “ते सरकारच्या मनावर आहे. मला वाटत नाही सरकार असं करेल. त्यांनी खून केलेला नाही हे मी आधीपासून सांगत आहे. गांधी हत्या नथुरामने केली पण विचार कोणाचे होते? हा प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी विचारलेला. वाल्मिक कराडवर हत्येचा आरोप सिद्ध झालाय. आम्ही ओरडून सांगत होतो. सरकार ऐकायला तयार नव्हतं. सीआयडीने आता समोर आणलय. तो खास माणूस आहे कोण म्हणालेलं? मग नैतिकता आहे की नाही? तुमचा खास माणूस इतका निदर्यी, क्रूर असेल मग काय करायचं?”
लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची ‘गुड न्यूज’
महाराष्ट्र शासनाचा ‘मेटा’सोबत करार, नागरिकांना 500 सेवा मिळणार व्हॉट्सअॅपवर, मुख्यमंत्र्यांची घोषणा
टोमॅटो फ्रीजमध्ये का ठेवू नयेत, ते साठवण्याचा योग्य मार्ग कोणता? जाणून घ्या ‘हे’ सोपे हॅक